Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Railway : आता बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, कधी सुरु होणार ? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2025 | 04:22 PM
आता बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, कधी सुरु होणार ? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य-X)

आता बीड येणार रेल्वेच्या नकाशावर, कधी सुरु होणार ? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित १५० कोटी रुपयांची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.

मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

फलटण ते लोणंद या रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत. बारामती रेल्वे स्थानकाच्या कामाला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्या. तसेच कामाला गती देऊन पुढील काळात सुसज्ज रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

असा आहे अहिल्यानगर – बीड – परळी रेल्वे मार्ग

रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१.२५ किलोमीटर, जमिनीचे एकूण भूसंपादन १८२२.१६८ हेक्टर, रेल्वे खालील एकूण पूल १३०, रेल्वे वरील पूल ६५, मोठ्या पुलांची संख्या ६५, छोटे पूल ३०२. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी, प्रकल्पाच्या समप्रमाणात ५०:५० टक्के हिस्सा नुसार केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा २४०२.५९ कोटी.

दरम्यान,६ व ७ ऑगस्ट या दोन दिवसांच्या बीड दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल २१ पेक्षा जास्त कार्यक्रम, आढावा बैठका घेऊन पाहणी कली. या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून, मंजुरी किंवा निधीअभावी रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावले. याच दौऱ्यात त्यांनी बीड-नगर रेल्वे प्रकल्पाच्या उर्वरित अडथळ्यांचा आढावा घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी थेट संपर्क साधत मंजुरी मिळवली. पुढील २० दिवसांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून १७ सप्टेंबर रोजी ही रेल्वेगाडी बीड स्थानकातून धावणार आहे.

Maharashtra Rain News: खूप झाली विश्रांती! राज्यात पावसाचे कमबॅक; ‘या’ जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढणार

Web Title: Beed city will soon be on the railway map when will it start deputy cm ajit pawar gave important information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Beed
  • railway

संबंधित बातम्या

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral
1

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

जमिनीपासून ४३ फूट खोल बोगद्यात बांधण्यात आलंय देशातील एकमेव रेल्वे स्टेशन; फक्त ४० हजार लोकसंख्या आणि हा देश नक्की आहे तरी कोण?
2

जमिनीपासून ४३ फूट खोल बोगद्यात बांधण्यात आलंय देशातील एकमेव रेल्वे स्टेशन; फक्त ४० हजार लोकसंख्या आणि हा देश नक्की आहे तरी कोण?

Maratha Reservation:अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना; मुंबईत घडामोडींना वेग
3

Maratha Reservation:अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना; मुंबईत घडामोडींना वेग

Ajit Pawar News: अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत; पुण्यातल्या बैठकीत नेमकं झालं काय?
4

Ajit Pawar News: अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत; पुण्यातल्या बैठकीत नेमकं झालं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.