
Baramati Politics, Parth Pawar, Ajit Pawar, Someshwar Factory Election,
दिवंगत अजित पवार हयात असताना सोमेश्वरच्या राजकारणात पडद्यामागून काही राजकीय डावपेच सुरू होते, अशी चर्चा असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. आता कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने हेच डावपेच उघडपणे पुढे येत असल्याची भावना काही सभासदांमध्ये असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ‘तुमच्याच आशीर्वादाने मोठे झालेले काहीजण आज तुमच्याच कुटुंबाला राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याच्या प्रयत्नात आहेत का?’, असा सवालही पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.
Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार,
विशेष म्हणजे ‘पार्थ, सावध हो’, असा थेट इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. सोमेश्वर हा अजित पवारांनी प्रेमाने जपलेला आणि वाढवलेला कारखाना असल्याचे नमूद करत, या कारखान्याच्या राजकारणाकडे तसेच कुटुंबाभोवती सुरू असलेल्या राजकीय हालचालींकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील राजकीय मतभेद आणि विभाजनाच्या पार्श्वभूमीवरही अशाच स्वरूपाची काही पत्रे आणि संदेश व्हायरल झाल्याची चर्चा होती. आता सोमेश्वरच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पत्राच्या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने ही पत्रे जाणीवपूर्वक व्हायरल केली जात आहेत का? याची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र पत्र कोणी लिहिले, ते प्रथम कोणी प्रसारित केले आणि त्यामागील नेमका उद्देश काय, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Sangamner Farmers Protest News: संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात राडा! आक्रमक
पवार कुटुंबातील राजकीय विभाजनाचा परिणाम बारामतीच्या राजकारणावरही झाला. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना साथ दिली, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मतदानातून पुन्हा पाठिंबा व्यक्त झाला. त्यामुळे पवार कुटुंबाशी असलेले बारामतीकरांचे भावनिक नाते आणि बदलती राजकीय समीकरणे सोमेश्वरच्या निवडणुकीतही चर्चेचा विषय ठरत आहेत.
आज अजित पवार हयात नसल्याची खंत बारामतीकरांच्या मनात असल्याचेही या राजकीय चर्चेत वारंवार व्यक्त केले जात आहे. मात्र आता पवार विरुद्ध पवार अशा स्वरूपात सोमेश्वरच्या निवडणुकीचे चित्र निर्माण झाले असून, या संघर्षात बारामतीकरांची राजकीय भूमिका काय राहणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. सध्या मात्र व्हायरल पत्रामागे नेमके राजकारण काय? हा प्रश्नच बारामतीकरांसमोर अनुत्तरित आहे. त्यामुळे या पत्राने सोमेश्वरच्या निवडणुकीतील राजकीय डावपेचांना नवा आयाम मिळाला आहे. सोमेश्वरच्या २१ जागांसाठी ५१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ३० सप्टेंबरनंतर अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.