भाजपच्या बीडमधील माजी आमदाराचा भीषण अपघातात मृत्यू; कारचा अक्षरश: लातूर तुळजापूर मार्गावर दुर्घटना
बीडमधून एक दु:खद बातमी आहे. माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं आत अपघातात निधन झालं. लातूर जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. आर टी देशमुख दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती होते. दरम्यान त्यांच्या मृत्यूने बीडकरांना धक्का बसला आहे.
Vaishnavi Hagavane News: वैष्णवीची आत्महत्या नव्हे हत्याच…; विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक दावे
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे आर टी देशमुख यांचा कारला अपघात झाला. यात आर टी देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यांना कारमधून बाहेर काढून तातडीने लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. आर टी देशमुख यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडे तत्काळ आपले कार्यक्रम रद्दे केले असून त्या लातूरला रवाना झाल्या आहेत.
माजलगावमधून ते आमदार झाले होते. बीडमध्ये भाजपचं संघटन मजबूत करण्यात त्यांचं मोठे योगदान होतं. दरम्यान त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे बीडच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आर टी देशमुख यांच्या निधनानंतर त्यांना अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पुणे-बंगळुरू हायवेवर तिहेरी अपघात! ट्रॅव्हल्सने कंटेनरला जोरदार धडक दिली अन्…
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘लातूरच्या माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं आज निधन झालं. त्यांच्या अपघाती जाण्याने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना सोनवणे यांनी व्यक्त केल्या आहेत.