
मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भीषण स्फोट (Photo Credit - X)
महामार्गावर अफरातफरी, वाहतूक थांबवली
प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा स्फोट इतका जबरदस्त होता की, धुळे-सोलापूर महामार्गावर अफरातफरी आणि दहशत निर्माण झाली. या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात भयंकर आगीने संपूर्ण परिसर आपल्या विळख्यात घेतल्याचे आणि आकाशात धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे.
धूं-धूं कर जला डीजल टैंकर! बीड के मांजरसुंबा घाट पर खौफनाक मंजर धुले-सोलापुर हाईवे पर में पाली घाट के पास कोलवाड़ी फाटा (Kolwadi Phata) पर टैंकर पलटने से भीषण आग लग गई है. आग की लपटों ने आसपास के इलाके और घास को भी अपनी चपेट में ले लिया है.#Beed #Manjarsumba #TankerBlast… pic.twitter.com/FIH3cpBdID — Kishor Joshi (@KishorJoshi02) December 12, 2025
वाहतूक ठप्प
अन्य कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
चालक आणि क्लिनरची माहिती नाही
या जोरदार स्फोटाच्या नेमक्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, टँकरचा चालक आणि क्लिनर यांचा शोध सुरू असून, त्यांच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पुढील माहिती वेळोवेळी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.