Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई येथील राजमा बियाणे पुरवठा करण्याच्या नावाखाली एका बियाणे व्यापाऱ्याची १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 08, 2026 | 04:10 PM
अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

Follow Us
Close
Follow Us:
  • अंबाजोगाई बियाणे फसवणूक प्रकरण उघड 
  • राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक
  • ‘येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या ६ संचालकांविरोधात FIR दाखल 
Beed Fraud Case: अंबाजोगाई येथील राजमा बियाणे पुरवठा करण्याच्या नावाखाली एका बियाणे व्यापाऱ्याची १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात साताऱ्यातील ‘येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या सहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील चौकशी करत आहेत. मात्र, या घटनेने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

अंबाजोगाई येथील सुयश प्रेमचंद मुथा गुरुवार पेठेतले रहिवासी हे बियाणे व्यवसाय करतात. जुलै २०२५ मध्ये साताऱ्यातील ‘येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’ चे संचालक संजय बाबासाहेब भगत व ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेऊन उच्च दर्जाच्या राजमा बियाण्याचे नमुने दाखवले होते. त्यानुसार मुथा यांनी २१ जुलै २०२५ रोजी एकूण ८५ टन राजमा खरेदीचा करार करून आरटीजीएसद्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. करारानुसार माल तपासण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, दाखविलेल्या दर्जाचा माल उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर तडजोड म्हणून त्यांनी २५ टनाची नवीन ऑर्डर देत एकूण २६ लाख ३१ हजार रुपये भरले. मात्र, ३० ऑगस्ट २०२५ रोजी आरोपींकडून केवळ १२ टन माल पाठवण्यात आला.

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

हा माल निकृष्ट दर्जाचा असून त्यामध्ये भेसळ, माती तसेच पेरणीस अयोग्य साहित्य मोठ्या प्रमाणात आढळले. उर्वरित माल किंवा पैसे परत मिळण्यासाठी मुथा यांनी वारंवार संपर्क साधला असता आरोपींनी पैसे देण्यास नकार देत असभ्य भाषेत उत्तर दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुथा यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारीका सोमनाथ शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप व बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस निरीक्षक शरद जोगदंड पुढील तपास करत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The ambajogai seed fraud case open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Beed
  • Fraud Case

संबंधित बातम्या

Beed Crime: भररस्त्यात थोबाडीत मारल्याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या; हा माझा शेवटचा फोन…
1

Beed Crime: भररस्त्यात थोबाडीत मारल्याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या; हा माझा शेवटचा फोन…

शिलाई मशिन, योजनेतून रोख 15 हजार देतो म्हणाला अन् 64 महिलांना गंडा घातला; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
2

शिलाई मशिन, योजनेतून रोख 15 हजार देतो म्हणाला अन् 64 महिलांना गंडा घातला; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Beed Crime: संतापजनक! 65 वर्षीय नराधमाकडून साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; खाऊचे आमिष अन्…
3

Beed Crime: संतापजनक! 65 वर्षीय नराधमाकडून साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; खाऊचे आमिष अन्…

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद
4

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.