वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही अॅडमिट का केलं नाही?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. दरम्यान यां हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुगांत असून त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. शनिवारी रात्री वैद्यकीय पथकाकडून त्याची तपासणी करण्यात आली मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट न करता उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.
साठ्ये कॉलेजमध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींच गूढ उकललं? फक्त काही मेसेजेमधून समजली ‘ही’ गोष्ट
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सध्या ते बीडच्या तुरुंगात आहेत. वाल्मिक कराडने तुरुंगात असताना अनेकदा प्रकृती ठीक नसल्याचे कारण दिले आहे. आता शनिवारी पुन्हा एकदा त्याची प्रकृती बिघडली होती. त्याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत होत असल्याचं वृत्त होतं.
तुरुंग प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथकाला याबाबत माहिती दिली. वैद्यकीय पथकाने कारागृहात जाऊन त्याची तपासणी केली, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
बीडच्या विशेष मोक्का कोर्टात संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर 3 जून रोजी युक्तिवाद झाला. वाल्मिक कराडच्या बाजूने निर्णय दिला असता तर तो तुरुंगातून बाहेर येऊ शकला असता, मात्र कोर्टाने विरोधात निर्णय दिल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला. त्याला आणखी काही काळ तुरुंगात राहावे लागणार आहे.
मैत्रिणीसोबत कारमध्ये दिसला म्हणून २० हजार उकळले; पुण्यातील दोन पोलीस निलंबित
दरम्यान, कराडच्या वकिलाने दाखल केलेल्या डिस्चार्ज अर्जाला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. दरम्यान दोन्ही पक्षांनी कोर्टात काही अर्ज दाखल केले होते, ज्यावर एकत्रित सुनावणी होणार आहे.