साठ्ये कॉलेजमध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींच गूढ उकललं? फक्त काही मेसेजेमधून समजली 'ही' गोष्ट
काही दिवसांपूर्वी विले पार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात 21 वर्षीय विद्यार्थिनी संध्या पाठक हिने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपले आयुष्य संपवले. ही घटना घडताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर तिच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होतं, हे उलगडणं गरजेचं वाटू लागलं. अनेकांनी ही आत्महत्या नसून घातपाताची शक्यता असल्याचे प्रश्न उपस्थित केले. या संशयास्पद प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी विले पार्ले पोलिसांवर होती. त्यांनी घटनास्थळी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशीला सुरुवात केली असून या घटनेचा तपशीलवार छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
साठ्ये कॉलेजमध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. संध्याच्या संपर्कातील मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आणि शिक्षकांची चौकशी सुरु केली. तसेच, पोलिसांनी संध्याचा मोबाईल आणि बॅग देखील चौकशीसाठी जप्त केले होते.
Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?
संध्याचा मोबाईल तपासात असताना पोलिसांना आढळले की ती एका मुलाला अनेक मेसेज केले होते. तसेच तिच्या बॅगमधून काही नैराश्यावरील औषध सापडले आहे. त्यावरून पोलिसांकडून असा अंदाज लावला जात आहे की ही आत्महत्या एकतर्फी प्रेमातून घडली असावी.
संध्याने आत्महत्या करण्यापूर्वी ज्या मुलाला मेसेज केले होते, त्याची आता पोलीस चौकशी करणार आहेत. तसेच त्याचा जबाब देखील नोंदवला जाणार आहे.
डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग, तर लॉजच्या नावाखाली कुंटणखाना…; मोहोळमध्ये चाललयं काय?
संध्या पाठक, वय 21, ही नालासोपारा येथे राहणारी तरुणी विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी सुमारे 7 वाजता, तिने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गुरूवारी रात्री नालासोपाऱ्याच्या आचोळे येथे संध्या पाठकच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.