मैत्रिणीसोबत कारमध्ये गप्पा मारत बसलेल्या तरूणांकडून धमकावून २० हजार पोलिसांनी उकळले. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मालिन झाल्याचे कारण देत परिमंडळ एकाचे प्रभारी पोलीस उपयुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
मुलाला तलाठी पदावर नोकरी लावून देतो म्हणत २८ लाखांचा घातला गंडा; तालुका क्रीडा अधिकाऱ्याची फसवणूक
नेमकं प्रकरण काय?
विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसले होते. तयावेळी पोलीस कर्मचारी
गणेश देसाई व योगेश सुतार हे रात्रगस्तीवर होते. ते दोघेही तेथे आले. त्यांनी तरुणाला तुमच्याबद्दल तक्रार आली आहे, असे पोलीस ठाण्यात प्रकरण न्यायचे नसेल तर 20 हजार रुपये दे, अशी मागणी केली. तरुणाजवळ साहजिक एवढे पैसे नव्हते. तर पोलिसांनी तरुणास दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून २० हजार रुपये काढण्यास सांगितले. ते २० हजार त्यांनी घेतले.
या सगळ्या घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या तरुण व त्याच्या मैत्रिणीने डेक्कन पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात आली. या प्रकाराबाबत दोन्ही पोळी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देणे आवश्यक होते. तरीही त्यांनी असे न केल्याने त्यांच्या या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मालिन झाल्याचा ठपका ठेवून दोघांचे निलंबन केल्याचे आदेश पोलीस उपयुक्त पिंगळे यांनी दिले आहे. गणेश देसाई आणि योगेश सुतार अशी निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
अज्ञात चोरट्यांची वृद्ध दाम्पत्यास मारहाण; 6 तोळे सोन्याचे दागिनेही केले लंपास
अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल व जाळी उचकटून घरात प्रवेश केला. यामध्ये झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण केली. याशिवाय, महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा १ लाख ८६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना (दि.२१) रात्री एक वाजण्याच्या सुमारास काठापूरच्या गणेश वस्ती (ता.आंबेगाव) या ठिकाणी घडली. कमल ज्ञानेश्वर जाधव (वय ७५, रा. काठापूर) व पती ज्ञानेश्वर जाधव (वय ८३) असे मारहाण झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नावे आहे. या घटनेची फिर्याद कमल ज्ञानेश्वर जाधव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
भांडणं सोडवण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; अंगावरची कपडे फाडत…