इंदापूर : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राधिका सेवा संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या दांडिया स्पर्धेला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (दि.१) हजेरी लावत लहान मुलांबरोबर दांडिया खेळत त्यांचा आनंद साजरा केला.
नवरात्री व दसऱ्याच्या निम्मिताने नगरसेवक अनिकेत वाघ यांच्या संकल्पनेतून आदिशक्ती राधिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर दांडिया स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ,छाया पडसळकर, सीमा कल्याणकर, सौरभ शिंदे,विकास खिलारे, श्रीकांत मखरे,शैलेश घोरपडे, राहुल गुंडेकर, शोएब बागवान, स्वप्नील धुमाळ आदी उपस्थित होते.
गरबा-दांडिया नृत्यास तरुणाईची गर्दी
कोरोनामुळे मागील दोन वर्षे गरबा प्रेमींचा आनंद हिरावला होता. या वर्षी मात्र कोणतेही निर्बंध नसल्याने इंदापूर शहरातील विविध ठिकाणी गरबा-दांडिया स्पर्धा, भव्य प्रदर्शन व विक्री बरोबरच नवदुर्गांचा सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे महिला वर्गासह गरबा-दांडिया नृत्यास तरुणाईची गर्दी पहावयास मिळत आहे.