
भरणे-दापोली रस्ता कामाला विलंब! काँग्रेसचा इशारा (Photo Credit- X)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास शेळके यांनी या संदर्भात खेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “नगरपरिषद हद्दीतील रस्ता क्षेत्रातील अडथळे तातडीने मोकळे करून कामाला परवानगी द्यावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.” डॉ. शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे की, भरणे ते दापोली या राज्य मार्गाचे काम मंजूर होऊनही नगरपरिषदेने रस्त्यासाठी लागणारी जागा मोकळी करून दिलेली नाही, ज्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडथळ्यात आला आहे.
Ratnagiri News : रस्त्याची दुरावस्था संपता संपेना; मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था
काँग्रेसने नगरपरिषद प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर जोरदार टीका केली आहे. “नगरपरिषद आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे खेडमधील विकासकामे पूर्णपणे ठप्प आहेत.” “जनतेचा संयम आता सुटला आहे. पुढील महिनाभरात जर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.” खेड काँग्रेसने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यास जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे. प्रशासनाला तत्काळ जागे होऊन काम सुरू करण्यासाठी हा अंतिम इशारा देण्यात आला आहे.
Ratnagiti News : हुल्लडबाजांमुळे दिवाळीचा बेरंग; हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांचा मनमानी कारभार