रत्नागिरी : खड्ड्यांचं वाढतं साम्राज्य आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था हे प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गाव असो किंवा शहर सगळेकडे वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्था ही वाढत चाललेली डोकेदुखी आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक ते साकूर फाटा या रस्त्याच्या अनेक ठिकाणी साईडपट्ट्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे.
याबाबत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचेकडे साईडपट्ट्याची दुरूस्ती व्हावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.या मागणीची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेत त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता,सावर्जनिक बांधकाम विभाग,संगमनेर यांना कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर कार्यकारी अभियंता मिसाळ यांनी मांडवे बु ते साकूरफाटा या रस्त्यांची साईडपट्ट्यांची दुरुस्ती दिवाळीनंतर लगेचच करणार असल्याचे आश्वासन रऊफ शेख यांना दिले असून त्यासाठी आर्थिक तरतुद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे साईटपट्ट्यांची लवकरच दुरूस्ती होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून साकूर ते मांडवे या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली असुन साईडपट्ट्या नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या दयनीय अवस्थेमुळे रस्त्यावरुन दोन मोठी वाहने पास होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच वाहन रस्त्यावरुन खाली उतरवताना साईडपट्टीच नसल्याने डांबरी रस्त्यालगत कपार निर्माण झाल्याने धोक्याचे झाले आहे.तसेच दुचाकीस्वारांना देखील वाहन चालवताना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. अनेक अपघात देखील घडत आहे. या महत्त्वाच्या विषयावर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. वाहन चालकांची खड्डे चुकवताना दमछाक होत आहे. तसेच या मार्गावरील पुलावर देखील हीच परिस्थिती असल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळ्यानंतर तरी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
रत्नाहगिरी जिल्ह्यात याआधीदेखील काही महिन्यांपासून खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत पावसात तर या खड्ड्यांमधून पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्डे चुकवणे अवघड होऊन बसत आहे. विशेष म्हणजे वाहने खड्ड्यात आपटून वाहन चालकाला त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चढ अथवा उतारात देखील हीच परिस्थिती असून खडी देखील मोठ्या प्रमाणात वर आली असल्याने दुचाकी घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत देखील नागरिकांनी एकत्र येत आंदोलनं केली होती.






