Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ अभियानाची केली सुरुवात

काँग्रेस पक्षाने प्रतिभा शोध अभियान सुरु केले आहे. या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2026 | 04:56 PM
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 'या' अभियानाची केली सुरुवात

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 'या' अभियानाची केली सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:
  • पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय
  • प्रतिभा शोध अभियानाची केली सुरुवात
  • प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी दिली माहिती
मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने काँग्रेसचा विचार, इतिहासाची माहिती असणारे, लोकशाही व संविधानवादी लोकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरु केला आहे. राज्यातील सर्व स्तरातील लोकांना यात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न असून त्यासाठी प्रतिभा शोध अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे माजी आमदार व या अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी केले आहे.

 

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिभा शोध अभियानाची माहिती देताना हरी शंकर गुप्ता पुढे म्हणाले की, जिल्ह्या जिल्ह्यात विविध विषयाची उत्तम ज्ञान असलेले अनेक लोक आहेत, त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यात निवड झालेल्यांना संशोधन विश्लेषक, प्रवक्ते तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची संधी देण्यात येईल. तीन टप्प्यात हा कार्यक्रम होणार असून, या अभियासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत, त्यानंतर त्या अर्जांची छाननी केली जाईल.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पत्रकार, इतिहास तज्ञ यांसह विविध क्षेत्रातील तज्ञ यांची समिती छाननी झालेल्यांची मुलाखत घेतील व त्यातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अंतिम निवड करेल. देशभरात हे अभियान सुरु असून, उत्तर प्रदेशातून ५५० जणांनी यासाठी नाव नोंदणी केली आहे तर जम्मू काश्मीर मधून १०० लोकांनी नोंदणी केली आहे. झारखंड, ओडीशा या राज्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही हरि शंकर गुप्ता म्हणाले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेश राजहंस उपस्थित होते.

यावेळी वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राजकारणात येण्याची अनेकांची इच्छा असते पण मार्ग नसतो. समाजातील प्रतिभासंपन्न लोकांच्या प्रतिभेला चालना देण्याचा काँग्रेस पक्ष प्रयत्न करत आहे. हा एक पारदर्शक कार्यक्रम आहे. लवकरच राज्याच्या सहाही भागात पत्रकार परिषद घेऊन या कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.

आर्थिक सर्वेक्षणावर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अतुल लोंढे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आहोत, तेच या आर्थिक सर्वेक्षणात सांगितले आहे. मेक इन इंडिया अपयशी ठरले आहे. आयात वाढली आहे. केंद्रापेक्षा राज्य सरकारांनी जास्त कर्ज काढल्याचे दिसत असून, हे कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज काढावे लागत आहे. विकास योजनावरचा खर्च कमी थांबवावा लागत आहे असे अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: The congress party has launched a campaign to strengthen the party organization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले : हर्षवर्धन सपकाळ
1

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले : हर्षवर्धन सपकाळ

सातारा ड्रग्ज प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळांची टीका; बड्या नेत्यांवर गेले गंभीर आरोप
2

सातारा ड्रग्ज प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळांची टीका; बड्या नेत्यांवर गेले गंभीर आरोप

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”
3

Republic Day Seating Row: राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”

वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर, म्हणाले; त्यांनी आता…
4

वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर, म्हणाले; त्यांनी आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.