Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : 200 कोटी रुपयांची जागा फक्त 3 कोटींना लाटली; वडेट्टीवारांच्या आरोपावर प्रताप सरनाईक यांचा खुलासा, म्हणाले…

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर “मीरा-भाईंदरमधील 200 कोटी रुपयांची जागा फक्त 3 कोटी रुपयांत लाटली” असा गंभीर आरोप करताच, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 08, 2025 | 07:09 PM
Bhayander News : 200 कोटी रुपयांची जागा फक्त 3 कोटींना लाटली; वडेट्टीवारांच्या आरोपावर प्रताप सरनाईक यांचा खुलासा, म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

 

  • 200 कोटी रुपयांची जागा फक्त 3 कोटींना लाटली
  • वडेट्टीवार आणि सरनाईक यांच्यात आरोप प्रत्यारोप
  • वडेट्टीवारांच्या आरोपावर प्रताप सरनाईक यांचा खुलासा
भाईंदर/विजय काते : काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर “मीरा-भाईंदरमधील 200 कोटी रुपयांची जागा फक्त 3 कोटी रुपयांत लाटली” असा गंभीर आरोप करताच, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या आरोपांवर आता प्रताप सरनाईक यांनी सविस्तर खुलासा करत सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज (शनिवार) सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपशीलवार खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेली जागा माझ्या सुनेच्या सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी भाडे तत्त्वावर देण्यात आली आहे. ही जमीन खरेदी केलेली नसून, केवळ भाडे तत्वावर घेतली असून सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच हा व्यवहार करण्यात आला आहे.”

शाळेच्या भिंतीवर पाठ्यपुस्तकातील धडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

सरनाईक पुढे म्हणाले, “या जागेचा कब्जा आणि वहिवाट पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने झाली आहे. या व्यवहारासाठी आम्ही4 कोटी 55 लाख रुपयांचा मुद्रांक भरला आहे तसेच 1कोटी 28 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीही जमा केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच निर्माण होत नाही. सर्व कागदपत्रे शासन नियमांनुसार तयार करण्यात आली आहेत.”

त्यांनी स्पष्ट केले की, या ट्रस्टमार्फत त्या जागेवर शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्प राबवले जाणार आहेत. “ही जमीन कोणत्याही प्रकारे माझ्या वैयक्तिक नावावर किंवा माझ्या कुटुंबातील कोणाच्या नावावर नाही. ट्रस्टमार्फत सर्व काम पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे,” असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले, “मी एक मंत्री म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे. माझ्या चांगल्या कामामुळे काही राजकीय नेते मतभेद निर्माण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. विजय वडेट्टीवार यांच्याशी माझे बोलणे झाले असून त्यांना मिळालेली माहिती अर्धवट होती. मी त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितला आहे.”

शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सरनाईक यांनी सांगितले की, प्रारंभी या आरोपांबाबत त्यांनी कायदेशीर नोटीस देण्याचा विचार केला होता, मात्र वडेट्टीवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गैरसमज दूर झाले. त्यामुळे सध्या या विषयावर पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी सरनाईक म्हणाले, “माझ्याविरोधात केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, माझ्या कामाची पारदर्शकता माझी ताकद आहे. मीरा-भाईंदरमधील सर्व विकासकामे नियमांचे पालन करूनच केली जात आहेत.”

या खुलाशामुळे सध्या मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात निर्माण झालेल्या तणावावर काही प्रमाणात पडदा पडला असून, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याने हा वाद तात्पुरता शांत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Web Title: Bhayander news land worth rs 200 crores sold for just rs 3 crores pratap sarnaiks clarification on vadettiwars allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • Meera Bhayander News
  • Pratap Saranaik
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 
1

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.