Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayandar Fort Making Competition 2026 : भाईंदरमध्ये शिवसेनेतर्फे किल्ले बनविणे स्पर्धा २०२६; विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक

Bhayandar Fort Making Competition 2026 : भाईंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी शिवसेनेतर्फे किल्ले बनविणे स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आल आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 14, 2026 | 07:46 PM
Fort Making Competition ( किल्ले बनवण्याची स्पर्धा )

Fort Making Competition ( किल्ले बनवण्याची स्पर्धा )

Follow Us
Follow Us:
  • थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन  
  • संकल्पना, इतिहास आणि वैशिष्ट्ये परीक्षकांना सांगावी 
  • नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश  
Bhayandar Fort Making Competition 2026 : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवसेनेतर्फे ‘किल्ले बनविणे स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह शहरातील सर्व वयोगटांतील नागरिकांना किल्ले निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

या स्पर्धेचे आयोजन शालेय गट आणि खुला गट अशा दोन विभागांत करण्यात आले आहे. शालेय गटामध्ये शालेय विद्यार्थी तसेच शाळांना सहभागी होता येणार आहे. तर खुल्या गटामध्ये संपूर्ण शहरातील सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभाग घेता येणार आहे. स्पर्धकांनी आपल्या घराच्या परिसरात किंवा सोसायटीमध्ये किल्ल्याची निर्मिती करायची आहे. किल्ला तयार करण्यासाठी कोणतीही ठरावीक थीम किंवा गड निवडण्याचे बंधन नसून स्पर्धकांना आपल्या आवडीनुसार ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारता येणार आहे.

थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन

किल्ले निर्मिती करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. किल्ल्याची रचना, ऐतिहासिक माहिती, गडाचे वैशिष्ट्य, प्रवेशद्वार, बुरुज, तटबंदी, दरवाजे, माची आणि पाण्याच्या टाक्या यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंची मांडणी यांना परीक्षणात विशेष महत्त्व दिले जाणार आहे. किल्ल्याची सजावट आकर्षक असण्याबरोबरच ती ऐतिहासिक दृष्टिकोनातून योग्य असणे आवश्यक आहे.

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका 

संकल्पना, इतिहास आणि वैशिष्ट्ये परीक्षकांना सांगावी

स्पर्धकांनी किल्ला स्वतः किंवा कुटुंबीयांच्या मदतीने तयार करणे अपेक्षित असून, किल्ला बनवितानाचे फोटो आणि व्हिडिओ तयार करणेही आवश्यक आहे. किल्ला तयार झाल्यानंतर परीक्षक प्रत्येक सहभागीच्या घरी किंवा सोसायटीमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी स्पर्धकांना आपल्या किल्ल्याची संकल्पना, इतिहास आणि वैशिष्ट्ये परीक्षकांना समजावून सांगावी लागणार आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गैरवर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक म्हणून एका विजेत्याला २५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक चार विजेत्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक चार विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येकी २ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश

या स्पर्धेमुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांची स्थापत्यशैली आणि स्वराज्याच्या पराक्रमाची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे. मनोरंजनासोबतच ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा आणि नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Mira Bhayandar News: महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी SOP; पण त्याच नियमावलीवरून महासभेतच रणकंदन!

Web Title: Bhayandar fort making competition 2026 shiv sena cash prizes sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Mira Bhayandar News
  • Pratap Saranaik
  • shivsena shinde group
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज
1

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका
2

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका

Eknath Shinde : नंदनवन बनलं आनंदवन! दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी, फराळ केला अन् दिल्या खास भेटवस्तू
3

Eknath Shinde : नंदनवन बनलं आनंदवन! दिव्यांग बांधवांसोबत एकनाथ शिंदेंची दिवाळी, फराळ केला अन् दिल्या खास भेटवस्तू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.