Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Narlikar passes away: मोठी बातमी! ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून, त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 20, 2025 | 01:24 PM
Jayant Narlikar passes away: मोठी बातमी! ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
Follow Us
Close
Follow Us:

Jayant Narlikar passes away: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने  निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील राहत्या घरी झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.  डॉ. जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली असून, सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत “हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत” मांडला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या सन्मानांनी गौरविले आहे. त्यांनी ‘आयुका’ (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना केली आणि संचालक म्हणून कार्य केले. त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे जुलै २०२३ मध्ये पुण्यात निधन झाले. त्या कर्करोगाने त्रस्त होत्या.

१९६६ साली डॉ. जयंत नारळीकर यांचा विवाह गणितज्ज्ञ मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन कन्या आहेत. १९७२ साली ते परदेशातून पुन्हा भारतात परतले. मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) खगोलशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९८८ मध्ये त्यांची पुणे येथील ‘आयुका’ (आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र) संस्थेच्या संस्थापक संचालकपदी नियुक्ती झाली.

कोरोना व्हायरसने पुन्हा डोके काढले वर; रुग्णांमध्ये होतीये झपाट्याने वाढ, पूर्वीपेक्षा सध्याचा व्हायरस…

डॉ. मंगला नारळीकर यांनी विज्ञानप्रसारातही मोलाची भूमिका बजावली. त्या ‘नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका असून, ‘पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे पुस्तक त्यांनी स्वतंत्रपणे लिहिले आहे. डॉ. जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक ललित लेखन मराठीतील विविध नियतकालिकांतून सातत्याने प्रसिद्ध होत असते. त्यांच्या अनेक पुस्तकांचे जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतर झाले असून, त्यांनी विज्ञानाचे लोकाभिमुख रूप जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे.

डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून, त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९६५ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण आणि २००४ मध्ये पद्मविभूषण या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवले. याशिवाय, डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिर्ला सन्मान, तसेच फ्रेंच अॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सन पुरस्कार हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांना प्राप्त झाले.

लातूरमध्ये दोन भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, पोलिस कर्मचारीही जखमी

डॉ. नारळीकर हे लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहकारी सदस्य आहेत. तसेच, इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचेही ते अधिछात्र (फेलो) आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीने त्यांना इंदिरा गांधी पारितोषिकाने सन्मानित केले आहे.विज्ञानविषयक साहित्यिक लेखन आणि विज्ञानप्रसारात दिलेल्या योगदानासाठी, युनेस्कोने १९९६ मध्ये त्यांना ‘कलिंग पारितोषिक’ प्रदान केले. त्यांच्या लेखनातून विज्ञान सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचे मोठे कार्य घडले आहे.

Web Title: Big news senior astronomer jayant narlikar passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • Jayant Narlikar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.