Terrible side effects of global warming! 6 cities to be submerged by 2050; Mumbai's Bandra-Worli sea link will also sink
बिपरजॉय चक्रीवादळाबाबत (Biparjoy Cyclone) सध्या एक मोठी अपडेट समोर येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या स्थितीत अरबी समुद्रात सक्रिय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून ६०० किमी पश्चिमेकडून संथ गतीने (ताशी तीन किमी) प्रवास करीत असून, रविवारपर्यंत ते अत्यंत तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.
[read_also content=”लुधियानामध्ये धाडसी चोरी! एटीएममध्ये रोकड जमा करणाऱ्या कंपनीत घुसले चोर, कामगारांना ओलीस ठेवून उडवले सात कोटी https://www.navarashtra.com/crime/thieves-entered-companies-depositing-cash-in-atms-looted-seven-crores-by-keeping-workers-in-ludhiana-nrps-414092.html”]
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही. पण या भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे.
सध्या हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील २४ तासांत बिपरजॉय ईशान्येकडे प्रवास करण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील तीन दिवस वादळ वायव्येकडे प्रवास करील. वादळाचा मार्ग प्रथमिकदृष्ट्या पाकिस्तानकडे जाताना दिसत असून, गुजरातमध्ये जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पुढील 12 तासांत अत्यंत रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असल्याचही IMD ने म्हटलंय.
सध्या हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. देशात चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. चक्रीवादळ पुढील 24 तासांत उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. देशात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसह गोव्यामध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.