देशभरात मुसळधार पावसाचा इशारा
अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता
नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन
India Weather Update: गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही राज्यांमध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता ऑक्टोबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोणता अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमानात बदल झाला आहे. तर काही ठिकाणी थंडी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
राजधानी दिल्लीत आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 8 ऑक्टोबरपर्यन्त शाळा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज गेले काही दिवस हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड व जम्मू काश्मीर या राज्यात पावसाने कहर केला होता. अनेक ठिकाणी ढगफूटी झाली होती. अनेक लोकांचे प्राण गेले होते. मोठे नुकसान झाले होते. जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता या राज्यामध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी
7 ऑक्टोबरपर्यंत जम्मू काश्मीरचे वातावरण खराब राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतावर येणार मोठं संकट
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाळा पोषक हवामान तयार झाले आहे. या पट्ट्याचे रूपांतर आता चक्रीवादळमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ मोठ्या वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ किनारपट्टीवरील ओडीशा आणि आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळचा वेग तशी 70 ते 75 कीमी प्रतीतास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागरिकांना सवधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.