Maharashtra Rain Alert: यंदा आणावॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये ...; चिंता वाढली
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
ऑक्टोबर महिन्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Rain Marathi News: राज्यात यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मे महिन्याच्या मध्यातच यावेळी पावसाळा सुरुवात झाली. पावसाळ्याच्या आधी सुरू झालेला पुस पावसाळा संपला तरी अजून जायचे नाव घेताना दिसून येत नाहीये. कारण जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात जोरदार धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातचा घास निसर्गाने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पावसाचे संकट अजूनही गेलेले नाही.
ऑक्टोबर महिन्यात देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी देखील पावसामध्येच साजरी करावी लागणार का हे अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ऑक्टोबर महिन्यात देखील राज्यसह देशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळा पोषक हवामान तयार झाले आहे. हवामानात हॉट असणाऱ्या बदलांमुळे सप्टेंबर महिना संपला तरी देखील पावसाळा संपलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा देखील चिंतेत सापडला आहे.
Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…
राज्यावरील पावसाचा धोका अजून टळलेला नाही. पुढील काही तासांमध्ये आणि पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अनेक राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील यादरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो.
राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेट. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत.