मुंबईत अधूनमधून पाऊस पडत आहे, तर दिल्लीत आज पावसाची शक्यता नाही. हवामान खात्याने महाराष्ट्र आणि मुंबईत अधिक पावसाची शक्यता सांगितली आहे. तसंच महत्त्वाचे काम नसल्यास घरी राहण्याचा इशारा दिलाय
अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस कोसळत आहे, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे उघडणार आहे.
दिल्ली-उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, मान्सून विजांच्या कडकडाटासह सक्रिय राहील
भारताचा बराचसा भाग हा मान्सूनने व्यापला आहे. मध्य व उत्तर भारतातील काही राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनरपट्टी, मुंबई, ठाण्यात अति मुसळधार पाऊस होऊ…
बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली होती. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
यावर्षी मान्सून नियोजित वेळेच्या 12 दिवसांपूर्वीच राज्यात दाखल झाला. गडचिरोली जिल्ह्यात लहान-मोठ्या नदी नाल्यांच्या काठावरील 154 गावांना पुराचा धोका आहे तर 112 गावे 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस संपर्काबाहेर असतात.
यंदा मान्सून नियोजित वेळेपूर्वी दाखल झाला असला तरी आजपासून हवामानाची दिशा बदलेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात हा टप्पा 2 जूनपर्यंत सुरू राहील,
यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. सरासरीच्या 108 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून १६ वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवली…
बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती,…
मान्सूनने केवळ केरळच नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रापर्यंत मोठा भाग व्यापला. २६ मे रोजी मान्सून निम्म्या भारतात दाखलं होणं ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.
अनके जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पुण्यातही पावसाने थैमान घातलं आहे. दौंड शहरात पावसाने पहिला बळी घेतला आहे. ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा अंगावर घराची भिंत पडून मृत्यू झाला आहे.
सिन्नर तालुक्यालाही पावसाने थैमान घातलं असून पावसाने सिन्नरच्या बस स्थानकाचं छत कोसळलं. कृषी मंत्री आणि स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून हे बस स्थानक उभारण्यात आलं होतं.
आतापर्यंतचे सर्व आंदाज मोडीत काढत नैऋत्या मोसमी वारे म्हणजेच मान्यून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
शनिवारी रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. दरम्यान गाझियाबादमध्ये एक दु:खद घटना घडली. अंकुर विहार एसीपी कार्यालयाचं छत कोसळून उपनिरीक्षक वीरेंद्र कुमार मिश्रा यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातलं असून नदी नाल्यांना मे महिन्यातच वाहू लागले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या २ दिवसात केरळात दाखल…
हवामान विभागाने पुढचे ६ ते ७ दिवस मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्यता वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रात कोकण, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Monsoon Update: २० मे रोजी मुंबईत मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाट पाहायला मिळाला. कर्नाटक किनाऱ्यावर चक्रीवादळ तयार होत असल्याने २१ ते २४ मे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यावर्षी पाऊस चांगला कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा 96 ते 100 टक्के पाऊस अपेक्षित आहे. नेमका हाच अंदाज कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या सवयींवरूनही लावला जात आहे.
शेतकरी आणि उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानातून आता अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिला तर केरळमध्ये २७ मे ते १ जूनदरम्यान दाखल…
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास ३३७ गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर उपाययोजना योग्य पद्धतीने राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत..