Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा वरचष्मा, शिंदेंची शिवसेनाही जोमात; महाविकास आघाडी बॅकफूटवर

पश्चिम महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाची सरशी झाली असून, महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 23, 2025 | 12:30 AM
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा वरचष्मा, शिंदेंची शिवसेनाही जोमात; महाविकास आघाडी बॅकफूटवर

पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा वरचष्मा, शिंदेंची शिवसेनाही जोमात; महाविकास आघाडी बॅकफूटवर

Follow Us
Close
Follow Us:
  • पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा वरचष्मा
  • शिंदेंची शिवसेनाही जोमात
  • महाविकास आघाडी बॅकफूटवर
पुणे/संदीप पाटील : पश्चिम महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाची सरशी झाली असून, महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे. लक्षवेधी लढतीत फलटणमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांचा धक्कादायक पराभव झाला, तर पंढरपूरमध्ये भगिरथ भालके यांच्या पत्नी डाॅ. प्रणिता भालके यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे आव्हान माेडीत काढत नगराध्यक्षपदाच्या मुकुटावर नाव काेरले. या निकालाने भाजपाने आपली मांड पक्की केल्याचे अधाेरेखीत झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात नगरपालिकांवर वर्चस्वासाठी भाजपा व शिवसेना शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली होती. विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर नगरपालिका निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाचा विजयी वारु कायम राहिला. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जेमतेम यश मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली. सातारा जिल्ह्यात भाजपा नंबर वन ठरला. दहापैकी सात पालिकांवर भाजपाने सत्ता प्रस्थापित केली. सातारा येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचाच बोलबाला राहिला.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट भाजपाला वरचढ ठरला. शिंदे गटाने मुरगुड, हातकणंगलेत झेंडा फडकाविला. कुरुंदवाड, जयसिंगपूरमध्ये माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सत्ता कायम राखली. कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्या साथीने आपला गड राखला. मुरगुडमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यानी मुश्रीफ-घाटगे गटाला धोबीपछाड दिला. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही भाजपाने बाजी मारली. गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ गटाने भाजपा, शिवसेना शिंदे गट, जनता दलावर मात केली. माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने पन्हाळा व मलकापूर नगरपालिकेवर वर्चस्व राखले.

जयंत पाटील भाजपाला भारी ठरले

सांगली जिल्ह्यात ईश्वरपूर व आष्ट्यात माजी मंत्री जयंत पाटील भाजपाला भारी ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही जयंत पाटील यांनी दोन्ही ठिकाणी आपला मुत्सद्दीपणा सिद्ध केला. विट्यात शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या ताब्यातील सत्ता खेचून आणली. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पाटील गटाला मोठा झटका बसला. शिराळ्यातही शिंदे गटाच्या पृथ्वीराज नाईक यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुलाल उधळला.

तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील (काका) यांच्या गटाने आमदार रोहित पाटील गटाचा पराभव केला. पलूसमध्ये माजी मंत्री विश्वजित कदम यांनी भाजपाचे आव्हान परतावून लावले. या निवडणुकीत महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटात वर्चस्वासाठी रस्सीखेच राहिली. काेल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजपाला मागे टाकले.

अकलूज मोहिते पाटलांनी राखले

सोलापूर जिल्ह्यात अकलूजमध्ये मोहिते पाटील गटाने भाजपाला रोखले. खासदार धैर्यशील माेहिते पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे यांची यांची खेळी निष्प्रभ केली. पंढरपूरमध्ये भगिरथ भालके यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कसर भरून काढत पत्नी प्रणिता भालके यांना निवडून आणले. पंढरपूर व मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी पाटील (बापू) यांनी शेकाप व भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले.

रामराजेंच्या पुत्राचा धक्कादायक पराभव

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे होमग्राऊंड असलेल्या कराडमध्ये भाजपाचे कमळ कोमेजले. येथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व शिवसेना शिंदे गटाने भाजपाला अस्मान दाखविले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिंदे गटाचे राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपाच्या विनायक पावस्कर यांचा पराभव केला. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तेला सुरुंग लागला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव केला.

Web Title: Bjp and shindes shiv sena have achieved success in the nagarpalika elections in western maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • Election Result
  • shivsena

संबंधित बातम्या

सर्वत्र ‘कमळ’च; महाराष्ट्रापाठोपाठ भाजपने ‘या’ राज्यात केली जादू; PM मोदींनी केले अभिनंदन
1

सर्वत्र ‘कमळ’च; महाराष्ट्रापाठोपाठ भाजपने ‘या’ राज्यात केली जादू; PM मोदींनी केले अभिनंदन

Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर
2

Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट
3

Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट

Amaravati News: काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी
4

Amaravati News: काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.