अपक्षांना गळाला लावण्यासाठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन; 'या' नेत्यांना दिली मोठी जबाबदारी
Maharashtra Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान सत्तास्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. अपक्ष आणि बंडखोर यांना संपर्क करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आज सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. भाजपने अपक्ष आणि बंडखोर यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे पाहायला मिळाले आहे.
अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली असून, 6 नेत्यांवर यासंदर्भात जबाबदारी सोपवली आहे. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भाजपने अपक्ष आणि बंडखोर यांना गळाला लावण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे. विजयी उमेदवारांना संपर्क साधण्यासाठी भाजपने 6 नेत्याना जबाबदारी दिली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे विजयी उमेदवार हे महाविकास आघाडी की महायुतीकडे येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या…
विधानसभा निकालाआधी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते आहे. भाजपचे अनेक मोठे नेते या बैठकीला हजर असल्याचे समजते आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना एकत्रित करण्यासाठी किंवा पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगांवकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. तर, मनसेचे बाळा नांदगावकर यांन देखील फडणवीसांची भेट घेतली आहे.
काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 37 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला 18 ते 30 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉँग्रेसला 28 ते 47 जागा मिळू शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35 तर शरद पवार यांच्या पक्षाला 25 ते 39 जागा मिळू शकतात.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताना दिसत आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अपयश दिसत आहे. पीपल्स प्लसच्या अंदाजानुसार राज्यात महायुतील 182 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी शंभरी देखील पार करू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत केवळ 97 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सने व्यक्त केला आहे.