महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याचा चाणक्य एक्झिट पोलचा अंदाज (फोटो- टीम नवराष्ट्र)
Maharashtra Vidhansabha Nivadnuk 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यनकीयत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. राज्यभरात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान पार पडले. ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. दरम्यान राज्यात महायुती की महाविकास आघाडीचे सरकार येणार हे पाहणे आवश्यक असणार आहे. चाणक्य एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात हे आपण जाणून घेऊयात.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. ही लढत अत्यंत चुरशीची असणार आहे. दोन्ही बाजूने अत्यंत तगडा असा प्रचार करण्यात आला आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चाणक्य एक्झिट पोल समोर आले आहेत. चाणक्य एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचे की महाविकास आघाडीचे सरकार येणार याबाबतचे काही अंदाज समोर आले आहेत.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 48 जागा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला 22 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीमधील सहयोगी पक्षाला 2 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याबाबत देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चाणक्य एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळू शकतात. त्यामध्ये कॉँग्रेस पक्षाला 63 जागा मिळू शकतात, कॉँग्रेस पक्ष मोठा पक्ष ठरू शकतो. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 35 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. तर शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला 40 जागांवर विजय मिळू शकतो. तर इतर पक्षांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान हा केवळ एक्झिट पोल आहे. अर्थात राज्यातील जनता कुणाच्या बाजूने आहे, हे 23 तारखेलाच कळणार आहे.
राज्यात 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान
राज्यात आज विधानसभेकरिता मतदान पार पडत असताना 5 वाजेपर्यंत सुमारे 58.22 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून तेथे 67.97% झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. तेथे 49.07 % इतके मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये 3771 पुरुष, 363 महिला आणि 2 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.