
भाजपने 42 नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता; अनेकांची बंडखोरी
भाजप– शिंदे गटाची युती जागावाटपाच्या वादात तुटल्यानंतर भाजपने १५८ जागांवर उमेदवार जाहीर केले, तर ७ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) साठी सोडल्या. तिकीट वाटप करताना अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवार बदलाचा खेळ सुरू होता. दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असलेल्या या गोंधळात अनेक दिग्गजांची तिकिटे कापली गेली. १६५ पैकी ९० जागांवर महिलांना, तर ७५ जागांवर पुरुष उमेदवारांना संधी देत भाजपने महिला कार्ड वापरले आहे. मात्र ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापल्याने पक्षात प्रचंड असंतोष उफाळून आला.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी बंडखोरी करत थेट दुसर्या पक्षांतून अर्ज दाखल केले. यामध्ये केवळ सामान्य नगरसेवक नव्हे, तर प्रभावी आमदार आणि वरिष्ठ नेत्यांचे पुत्र-नातेवाईक यांनाही भाजपने मोकळे केले. या निर्णयामुळे अनेक राजकीय घराण्यांची गणिते कोलमडली आहेत. काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, तर काहींनी भाजपला रामराम ठोकत दुसर्या पक्षाचा झेंडा हाती घेतला.
कोणाकोणाला दाखविला घरचा रस्ता?
ऐश्वर्या जाधव, मारुती सांगळे, आयुब शेख, श्वेता गलांडे-खोसे, मुक्ता जगताप, सुनीता गलांडे, संदीप जराड, सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य माळवे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, प्रकाश ढोरे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अमोल बालवडकर, श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माथवड, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, राजेश येनपुरे, योगेश समेळ, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, सम्राट थोरात, मनीषा लडकत, संजय घुले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, सरस्वती शेंडगे, आनंद रिठे, शंकर पवार, वृषाली चौरे, नीता दांगट, राजश्री नवले, दिशा माने, दीपक पोटे, मनिषा कदम, गायत्री खडके, वृषाली चौधरी, अर्चना मुसळे