Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivjayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा; सकाळी साडेसात वाजता होणार सुरुवात

महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. पदयात्रा मार्गावर पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2026 | 11:03 AM
शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा

शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा

Follow Us
Follow Us:

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात गुरुवारी (दि.१९) सकाळी ७.३० वाजता मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सांगली ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. मेगा पदयात्रेबाबत आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, नगरप्रशासन शाखेचे सहआयुक्त दत्तात्रय लांघी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, तहसीलदार लीना खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम आदी उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. पदयात्रा मार्गावर पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पर्यायी मार्गाचे नियोजन करावे. महापालिकेने पदयात्रा मार्ग व पुतळा परिसराची स्वच्छता करावी. शिवजयंतीनंतरच्या दिवशीही स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी.

आरोग्य विभागाने पदयात्रा मार्गावर रुग्णवाहिकेसह तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करावे. कोणताही आजारी विद्यार्थी पदयात्रेत सहभागी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरावरही पदयात्रा आयोजित करून ‘किल्ले महोत्सवा’ अंतर्गत संबंधित किल्ल्यांवर कार्यक्रमांचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हा प्रशासन सांगली यांच्या समन्वयातून १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘श्रीमंतयोगी’ सादर करण्यात येणार

१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ‘गाथा छत्रपती शिवरायांची- जागर शाहिरीचा’ या कार्यक्रमांतर्गत पारंपरिक पोवाडे, शिवस्फूर्तीगीते, मर्दानी खेळ व लोकगीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शिवचरित्रावर आधारित महानाट्य ‘श्रीमंतयोगी’ सादर करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

हेदेखील वाचा : Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी

Web Title: Mega padyatra in sangli tomorrow on the occasion of shiv jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • sangli news
  • Shiv Jayanti
  • Shivjayanti 2026

संबंधित बातम्या

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे
1

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार
2

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी
3

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी

Tukaram Mundhe: लोकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार! ‘या’ शहरात FDA ची धडक कारवाई
4

Tukaram Mundhe: लोकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार! ‘या’ शहरात FDA ची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.