अमरावतीमध्ये राजकारण तापले (फोटो- सोशल मीडिया)
काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
अमरावतीमध्ये राजकारण तापले
161 उमेदवारांनी घेतली माघार
अमरावती: शहरातील नवव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत संपताच निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज छाननी व माघार प्रक्रियेनंतर अमरावतीमध्ये एकूण १६१ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली असून, आता ७झोनमधून तब्बल ६६१ उमेदवार निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. शनिवारी (दि. ३) उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचार अधिक वेग घेण्याची चिन्हे आहेत. माघारीच्या पहिल्या दिवशी केवळ ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र, शुक्रवारी शेवटच्या दिवशी, माघारीच्या अंतिम दिवशी १५० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने मोठी गर्दी पाहायला मिळाली.
झोननिहाय पाहता, झोन क्रमांक २ मध्ये सर्वाधिक २७ उमेदवारांनी माघार घेतली, तर झोन क्रमांक-६ मध्ये सर्वांत कमी ११ उमेदवारांच्या संख्येनुसार झोन क्रमांक ७ सर्वाधिक गजबजलेला ठरला आहे. येथे १२६ उमेदवार रिंगणात आहेत. त्याखालोखाल झोन क्रमांक-४ मध्ये १०८, झोन क्रमांक-२ मध्ये १००, झोन क्रमांक-१ मध्ये ९७, झोन क्रमांक ३ मध्ये ९४, झोन क्रमांक-५ मध्ये ८३, तर झोन क्रमांक ६ मध्ये सर्वात कमी ५३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
आज मिळणार निवडणूक चिन्हे
निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शनिवारी उमेदवारांना त्यांची निवडणूक चिन्हे वाटप केली जाणार आहेत. चिन्ह मिळताच सर्व उमेदवार आपल्या आपल्या प्रभागांमध्ये प्रचार अधिक तीव्र करणार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचार रणनीतींना अंतिम स्वरूप दिले आहे. अपक्ष उमेदवारही घराघरांत जनसंपर्क वाढविताना दिसत आहेत. तिरंगी व चौकोनी लढतींनी रंगणार निवडणूक: अनेक प्रभागांमध्ये एकाहून अधिक बलाढ्य उमेदवार रिंगणात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची व रंगतदार स ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, मूलभूत सुविधा व नागरी प्रश्न हे प्रचाराचे अमुख मुद्दे राहणार आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






