Maratha Reservation: जरांगेंकडून फडणवीसांच्या आईचा अवमान; लाडांचा इशारा; म्हणाले, "सल्ला समजा किंवा..."
Manoj Jarange Patil: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झाले आहेत. 29 तारखेला राज्याच्या राजधानीत मनोज जरांगे पाटील धडक देणार आहेत. दरम्यान बीडमधील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आता मनोज जरांगे पाटलांना इशाराच दिला आहे.
ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी बीडमध्ये सभा घेतली. यामध्ये त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा देखील उल्लेख केला. यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
प्रसाद लाड यांची टीका
मनोज जरांगे पाटील, निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते. हा सल्ला समजा किंवा इशारा… छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान कसा करावा हे आपल्याला शिकवलं!
मनोज जरांगे पाटील,
निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते.
हा सल्ला समजा किंवा इशारा…छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान कसा करावा हे आपल्याला शिकवलं!
त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा… pic.twitter.com/SVmEk0wHbb— Prasad Lad (@PrasadLadInd) August 25, 2025
त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्यापद्धतीने महिलांचा अपमान करताय! मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही! ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते.
जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दल अपशब्द: राणेंचा धमकीवजा इशारा
काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
जे रक्ताने मराठे असतात, ते कधीच कोणाच्या आईबाबट अपशब्द वापरणार नाहीत. ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच प्रत्येक माता-भगिनीचा आदरच केलेला आहे. जरांगे पाटलांनी आरक्षणाची लढाई लढावी.
ती लढाई लढत असताना यांच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर, ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.