''खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काँग्रेसला विदेशातून... ''; भाजप माध्यम प्रमुख के. के. उपाध्याय यांचा आरोप
पुणे: लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार हे खोटं निरेटिव्ह सेट केला होता. त्याचा फायदा त्यांना झाला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कांग्रेसला खोटा नेरीटिव्ह सेट करण्यासाठी विदेशातून आर्थिक रसद पुरवली जात आहे, असा गंभीर आरोप भाजप माध्यम विभागाचे प्रमुख के. के. उपाध्याय यांनी आरोप केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कांग्रेसचा खोटा नेरिटिव्ह मतदारांपुढे मांडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही उपाध्याय म्हणाले. भाजप माध्यम विभागाचे प्रमुख के. के. उपाध्याय आणि महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवृक्ते केशव उपाध्ये ‘नवभारत’ संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत.
के.के. उपाध्याय म्हणाले, ”भारतीय जनता पक्ष हा केडरबेस पक्ष असून, तो वर्षाचे बारा महिने इलेक्शन मोडमध्ये असतो. कारण देशात वर्षाला कुठे ना कुठे निवडणुका असतात. त्यामुळे भाजप कार्यकर्ते तयार असतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी विशेष योजना सुरु केल्या आहेत. त्यात एसटी बस प्रवासामध्ये ५० टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षण आणि लाडकी बहिण योजने चा समावेश आहे. महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत असून, महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरुन वांदग निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना १०० पेक्षा अधिक तर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ७० जागा मागत आहेत. त्यावर तोडगा कसा काढला जाईल? या प्रश्नावर उपाध्याय म्हणाले, ”भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महायुती म्हणून निवडणकीला सामोर जाईल, यात शंका नाही. प्रत्येक पक्षाने जास्ती-जास्त जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे यात काही चुकीचे नाही. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून कोणती-जागा कोण जिंकेल, यावर ती जागा कोणाला मिळेल, हे पक्षाचे प्रमुख ठरवतील. जो निर्णय घेतला जाईल, तो महाराष्ट्र आणि महायुतीच्या हिताचे असेल.” लोकसभा निवडणुकीत कांग्रेसने भाजप पुन्हा सत्तेत आसल्यास संविधान बदलले जाईल, असा खोटा नेरिटिव्ह सेट केला होता. आता ते २० टक्के समुहाला जवळ करुन ८० टक्के हिंदू समाजामध्ये ताटातूट निर्माण करुन जाती-पातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत,अस आरोप के.के. उपाध्याय यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकींना विकासाच्या मुद्यावर आम्ही सामोरे जाणार आहोत. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास पहिल्या अडीच वर्षांत कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. दुसऱ्या अडीच वर्षात महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यातील एक असलेल्या पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबईतील कोस्टल रस्ता मार्गी लागला, लाकडी बहिण योजना राबविण्यात आली. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना छोट्या-छोटया कामासाठी पतीकडे पैसे मागण्याची गरज भासत नाही. उद्योगाला चालना मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
लाडकी बहिण योजनेसाठी इतर शासकीय योजनांचा निधी रोखण्यात आला आहे, असे आरोप विरोधक करत आहेत. त्यावर बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, ”हे खोट नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वीच एकाही योजनाचा निधी वळविण्यात आलेला नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे खोटे आहेत. कोणीही एकाही योजनाचा निधी वळवल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हान उपाध्ये यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून विरोधक लाडकी बहीण योजनेवर बोलणे टाळत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्ष सातत्याने आरक्षणाचे समर्थन केले आहे. मात्र, अमेरीकेत जाऊन राहूल गांधी यांनी आरक्षण विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कारण यापुर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही आरक्षण संपवण्याची भाषा केली होती. राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील त्या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहोत. कारण आज जरी आरक्षण संपणार नसले तरी भविष्यात ते विचार करु शकतात, असे के. के. उपाध्याय म्हणाले.