Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

ऐन निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि शिंदेगटातील वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या सविस्तर.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 09, 2026 | 06:58 PM
Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:
  • “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात”
  • नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : गेल्या निवडणूकीत म्हणजेच  2015 साली स्मार्ट सिटी प्रकल्प मोदींनी आणला. त्यांनी विरोध केला. महासभेत प्रस्ताव फेटाळला. 100 कोटी सुरुवातीचा निधी येणार होता. अनेक पालिका शासनाकडे निधीची मागणी करतात. केंद्र सरकारच्या योजना नाकारणारे हे आहेत येथील मूलभाजपाच्या निष्ठावंतांना त्यांनी डावलले आहे. त्यामुळे अनेक भाजपाचे पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. संघाच्या उमेदवारांना डावलले आहे. त्यांना आम्ही तिकीट दिले आहे. त्यामुळे आमची लढाई ही भाजपा विरोधात नसून ” नाईक जनता पार्टी ” विरोधात आहे असा हल्लाबोल शिवसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी केला.आज नरेश म्हस्केंच्या हस्ते “नवी मुंबई नवं सरकार ” असे शीर्षक दिलेला वचननामा प्रसिद्ध केला. त्या वचननाम्याच्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गणेश नाईक सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर करत असलेल्या आरोपाचा समाचार घेतला.

Mumbai Political News: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ उपविभाग प्रमुखाने हाती घेतले ‘कमळ’

म्हस्के म्हणाले की, सिडको ट्रान्स्फर चार्जेसचा मुद्दा इतके वर्ष नवी मुंबईत राहून त्यांना सोडविता आला नाही. प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा सोडविता आला नाही. 30 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे असे ते म्हणतात मग, पार्किंगचे नियोजन त्यांना का करता आले नाही? असा सवाल म्हस्केंनी विचारला.

कंपन्यांकडून जिझिया कर व हडपलेले भुखंड

नवी मुंबई एमआयडीसीतील कंपन्या गुजरातला का जात आहेत? याचे उत्तर जनतेने शोधावे. Ya कंपन्यांमधून जिझिया कर कोण घेते? बावखळेश्वर मंदिराची जमीन कोणी हडपली ? ग्लास हाऊस कोणत्या भूखंडावर उभे केले होते? कोणी हडपलेली ती जमीन ? अडवली भुतवली 350 एकर वनविभागाची जमीन रेसिडेनशियल केली. एकनाथ शिंदेंनी ती पुन्हा फॉरेस्टमध्ये टाकली. आपण दुसऱ्याला चोर म्हणायचे आणि स्वतः मात्र भूखंडांची दरोडेखारी करायची असा टोला खासदार म्हस्के यांनी नाईकांचे नाव न घेता लगावला.

पुनर्विकासाला विरोध का?
नवी मुंबईत आता शहरात कुटुंबे वाढली आहेत. त्यांना मोठे घर हवे आहे. इमारती धोकादायक बनल्या आहेत. ही मंडळी सामान्य आहेत. त्यांना मोठे घर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ते पुनर्विकासाकडे डोळे लावून बसले आहेत. पुनर्विकासाला चालना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याचे म्हस्के म्हणाले.

अमेरिकेला लिहिलेल्या मोदीं विरोधातील पत्रात संजीव नाईकांची सही

2012 साली खासदारही अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षांनी पत्र लिहिले होते. त्यात त्यांच्यावर विविध गंभीर आरोप केले होते. त्यावेळी खासदारांनी ज्या सह्या केल्या होत्या. त्यात संजीव नाईक यांची देखील सही होती. मोदींबद्दल आकस असणाऱ्यांनी आता भाजपाचे कातडं पांघरले आहे. इथले संघाचे लोक होते. त्यांची तिकिटे कापली गेली. स्वतःची स्तुती करणारे लोक हवेत. त्यांना मलिदा आणून देणारे हवेत. नाईक विरुद्ध संघ व भाजपा असे चित्र सध्या नवी मुंबईत आहे.

प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे एकनाथ शिंदेंनी सोडवले

इतकी वर्ष ही नेते सत्तेत होते. पालिकेपासून ते दिल्लीपर्यंत हे सत्तेत होते. मात्र यांना नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविता आला नाही. कारण आम्ही पाठपुरावर करत आहोत असे सांगितले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विषय समजून घेत, अध्यादेश काढला. प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिंदे साहेब नुसते आश्वासन देत बसले नाहीत असा घणाघात जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी केला.

यांच्या अहंकारामुळे नवी मुंबईचे नुकसान

शिवसेनेत असताना यांचे बाळासाहेबांसोबात मतभेद होतें काँग्रेसमध्ये असताना, विलासराव देशमुख व, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत भांडण होते. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत वाद तयार करत आहेत. यांच्या अहंकारामुळे नवी मुंबईचे नुकसान झाले आहे. मानखुर्द पर्यंत मेट्रो पोहोचली मात्र ती नवी मुंबईत येऊ शकली नाही. डिपी प्लॅनमध्ये मेट्रो टाकली गेली नाही. सर्वाधिक जास्त अनधिकृत बांधकाम त्यांचा माजी आ. संदीप नाईक आमदार असताना ऐरोलीत झाले.बोनकोडे गाव यांना सुधारता आले नाही असा टोला जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गणेश नाईक यांना लगावला.

एफडी मोडून जनतेची कामे झाली

पालिकेची एफडी ठाणेकरांनी मोडली या गणेश नाईकांच्या आरोपांना यावेळी म्हस्केंनी उतर दिले.ते म्हणाले की एफडी मोडली म्हणजे काय केले? ते पैसे जनतेसाठी जनतेच्या गरजांसाठी वापरले. त्यातून कोणाची घरे नाही भरली. गरज पडल्यावरच एफडी मोडायच्या असतात, त्यासाठीच त्या ठेवलेल्या असतात अस म्हस्के म्हणाले.

धरणाचे क्रेडिट नाईकांचे कसे ?

म्हस्के म्हणाले की, गणेश नाईक आरोप करतात की प्रशासकाच्या अडून निर्णय घेतले गेले. तिजोरी लुटली गेली. ते म्हणतात की पाण्याच्या नियोजनासाठी पोशिर धरणाचा निर्णय आम्ही घेतला. जर प्रशासन आम्ही चालवत असू, तर मग ते पोशिर धरणाचे क्रेडिट शिंदेंना जाते. नगरविकास खात्याशी तुमचा संबंध काय? हा निर्णय नगरविकास खाते घेते. वाईट झाले की शिंदेंनी केले. चांगले झाले तर मी केले ही भूमिका यांची आहे. हे बिबट्या आल्यावर शेळ्या सोडायला सांगतात असे यांचे व्हिजन असल्याचा टोला त्यांनी लगावला.

BJP अन् RPI च्या उमेदवारांचा गृहभेटीवर भर; भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन

विक्रांत पाटलांचा नाईकांच्या प्रस्तावाला मूक विरोध ?

भाजपा व शिंदे सेनेत युतीसाठी बैठका सुरू होत्या. त्या दरम्यान भाजपाने अवघ्या २० जागा शिवसेनेला देऊ केल्या होत्या. त्यावर म्हस्के यांनी अंडर की बात पत्रकारांसमोर शुक्रवारी उघड केली. म्हस्के म्हणाले की, त्यांनी आम्हाला 20 जागा देऊ केल्या. मी विधानपरिषदेचे भाजपचे आ. विक्रांत पाटील यांना सांगितले की, हा प्रस्ताव तुम्हाला स्वतःला मान्य असेल तर आम्ही सही करतो. मात्र त्यांनी त्यावर सही केली नाही. त्यामुळे आता विक्रांत पाटील यांना देखील नाईकांनी दिलेला प्रस्ताव मान्य नव्हता का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

पुनर्विकासात टक्केवारी

यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी नाईकांच्या पुत्रावर गंभीर आरोप केले. नाईक पुनर्विकासवरून एकनाथ शिंदेंवर प्रहार करत आहेत. मात्र यांचे चिरंजीव प्रत्येक पुनर्विकासाच्या प्रकल्पात जाऊन टक्केवारी घेत असतात असा आरोप नाहटा यांनी केला. ठाण्यात युतीच्या बाबतीत मिठाचा खडा त्यांनी टाकल्याने त्यांच्याकडून ठाण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याचा खुलासा नाहटा यांनी केला.

Web Title: Navi mumbai election our fight against naik janata party ganesha of naresh mhaske attacked the heroes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Ganesh Naik
  • Naresh Mhaske

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी
1

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले
2

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला
3

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
4

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.