
डॉ. श्रीकांत शिंदेची एकाकी झुंज
ठाणेः सर्वाधिक महापालिका असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्याची सुरुवात कल्याण-डोंबिवली पासून केली आहे. भाजपच्या या ऑपरेशन लोटस मध्ये कल्याण लोकसभेचे खासदार तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉकटर श्रीकांत शिंदे यांना भाजपने पूर्णतः एकाकी घेरले आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत कडवट समर्थक असलेल्या तालुकाप्रमुख तसेच, नगरसेवक महेश पाटोला यांच्यासह चार नगरसेवकांना भाजपने आज कमळ हातात दिले. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्यामधील संघर्ष पराकोटीला गेला आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा सर्व ठिकाणी भाजपने ऑपरेशन लोटस राबविण्यास सुरुवात केली आहे.
Shrikant Shinde : ‘एनडीए’कडून श्रीकांत शिंदेंची ‘या’ पदासाठी नियुक्ती, बैठकीत महत्त्वाचा निर्णय
निमित्त केडीएमसीचे.. डोळा कल्याण लोकसभेवर !
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतून आमदार महणून निवडून येतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात असलेली कल्याण महापालिका भाजपाला स्वतःध्या ताब्यात हथी आहे. मात्र, कल्याण लोकसभेचे खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्याही मतदारसंघात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंवरनाथ आणि त्याचप्रमाणे ठाणे महापात्रिकेचा फळवा, मुंब्रा, दिया हा भाग येतो. ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपेश मात्रे यांना काही दिवसांपूर्वीच भाजपने स्वतःच्या पक्षात घेतले.
वास्तविक दीपेश म्हात्रे आणि श्रीकांत शिंदे हे एकमेकांचे अत्यंत घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जात होते. ठाकरेंच्या सेनेमधून बाहेर पडून ते शिशंद यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते. तथापि, त्या पूर्वीच रवींद्र चव्हाण यांनी कपिल पाटील पांच्या माध्यमातून दीपेश म्हात्रे यांच्यावर जाळे फेकले आणि दीपेश महाले यांना भाजपमध्ये खेचून घेतले. दीपेश म्हात्रे यांचा हा भाजप प्रवेश शिंदे सेनेच्या खूप जिकारी लागला. त्या पाठोपाठ कल्याण पूर्वेतील सेनेच्या पदाधिकाऱ्याला देखील अशाच प्रकारे
भाजपमध्ये घेण्यात आले. त्यामुळे मग डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीदेखील स्वतःकडील हुकमी पत्ते बाहेर काढायला सुरुवात केली. त्यातूनच उल्हासनगर मधील भाजपचे माजी जिलाध्यक्ष महेश सुखरमाणी, माजी जिल्हाध्यक्ष तसेच स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश माखीजा, राम चाली यांच्यासह भाजपचे पाच नगरसेवक टीम ओमी कलानीच्या माध्यमातून शिवसेनेकडे पळवण्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यश आले.
उल्हासनगर बालेकिल्ला
उल्हासनगर हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला असून येथील व्यापारी आणि उद्योजक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर भाजपशी संलग्न आहे. त्यामुळे भाजपमध्ये उल्हासनगरात पडलेले भगदाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागले, उल्हासनगर मध्ये भाजपात झालेली फोडाफोडी ही रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पांचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह शिवसेनेने तथ्याक तीन वेळा स्थायी समिती सभापतीपद दिलेले वामन म्हात्रे यांची चिरंजीव अनमोल महात्रे यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केलेला भाजप प्रवेश शिदिसेना आणि भाजपमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू ठरला. भाजपचे हे ऑपरेशन लोटस राबवण्यामागे जो प्रमुख हेतू आहे तो जरी कल्याण डोंबिवलीची महापालिका भाजपकडे राखण्याचा असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेकडे असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपला आधीपासून खुणावत आहे.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघ स्वत:कडे घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच या महारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिदि यांच्यापुडे भाजप नेत्यांची डाळ शिजू शकली नाही. 2024 मध्ये तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेले होते एका मतदारसंघात मनसेचे आमदार होते तर एक मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार होते. अंबरनाथ मधील डॉक्टर बालाजी किणीकर हे त्यावेळेला कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकमेव शिंदे सेनेचे आमदार होते. मात्र तरीही एकनाथ शिदिमांच्या आग्रहाखातर कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला शिंदे यांच्या शिवसेनेला सोडावा लागला आणि त्याचे फार मोठे शल्य भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे.
श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी
डॉ. श्रीकांत शिंदे यांची एकाकी झुंज
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे संबंध मैत्रीपूर्ण होते. मात्र रविंद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून शिंदेंच्या मैत्रीच्या आगि नियंत्रणाच्या बाहेर गेले, कल्याण-डोंबिवली अंबरनाथ या महापालिका नगरपरिषदा प्रदेशाध्यक्ष म्हणून जिंकणे हे रवींद्र चहाण यांच्यासाठी सर्वात मालाचे आहे. त्यामुळे भाजपाने राज्य सरकारमधील आणि केंद्र सरकार मधील ताकद ही रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभी केल्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेना वध्यामध्ये सतेसाठी ‘काटे की टकार सुरू झाली आहे.
मात्र, तरी देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे रविंद्र चव्हाण यांच्याशी जोरदार टक्कर देत आहेत, लोकसभा निवडणुकीस जरी अवकाश असला तरी देखील या महापालिकांमधील भाजपचे प्राबल्य वाढल्यास त्याचा त्रास हा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना होऊ शकतो हे लक्षात घेऊन शिंदे यांनी भाजपला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.