भाजपचे नवी प्रदेशाध्यक्ष झालेले रवींद्र चव्हाण यांची संपूर्ण माहिती आणि राजकीय प्रवास (फोटो - सोशल मीडिया)
Ravindra Chavan Political News : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. यामध्ये आता भाजप महाराष्ट्राला नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. रवींद्र चव्हाण यांची भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पक्षामध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेले रवींद्र चव्हाण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. मागील 25 वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांनी समाजकारण आणि राजकारण केलेले आहे. आता त्यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी त्यांच्यावर अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डोंबिवलीमधील असलेले रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नगरसेवक पदापासून राजकारणामध्ये सुरुवात केलेले रवींद्र चव्हाण यांनी आता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारली आहे. 2002 साली त्यांची भाजपच्या युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरु आहे. 2009 सालापासून रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमददार म्हणून निवडून आले. त्यांनी डोंबिवलीमध्ये विजयाची हॅटट्रीक केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२०१६ साली तत्कालीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागली. तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली. 2016 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार रवींद्र चव्हाण हे ठरले.
2020 साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2022 साली स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री स्वीकारले. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या दोन खात्यांचा कारभार पाहिला. तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पाहिली. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या नेतृत्वाखाली काम करता आले. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पर्व प्रदेश प्रभारी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदांवर रविंद्र चव्हाण कार्यरत होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा