Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरीट सोमय्यांचा पक्षाच्या आदेशाला नकार! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली प्रतिक्रिया

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. दरम्यान, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने किरिट सोमय्या यांना जबाबदारी दिली होती. मात्र ती त्यांनी नाकारली असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 11, 2024 | 12:31 PM
Chandrashekhar Bawankule on kirit somaiya

Chandrashekhar Bawankule on kirit somaiya

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासह सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुती सह महाविकास आघाडीमधील नेते जोरदार तयारीला लागले आहे. सभा आणि बैठका यांचे सत्र वाढले आहे. दरम्यान, महायुतीमध्ये अंतर्गत वादविवाद आणि धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा आहेत. अनेकांनी याबाबत वक्तव्य केली आहेत, सध्या भाजप पक्षाचे नेते किरिट सोमय्या यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे किरिट सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून किरिट सोमय्या यांची संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र पक्षाने दिलेला हा आदेश आणि जबाबदारी किरिट सोमय्या यांना आवडली नाही. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही जबाबदारी नाकारली. तसेच आपली नाराजी उघड केली. यामुळे आता किरिट सोमय्या पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरुन विरोधकांनी देखील टीका केली आहे. त्यावर आता भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. आता कोणाला आमदारकी द्यायची असेल तर पक्ष विचारत नाही. किंवा एखादी जबाबदारी द्यायची असेल तर विचारून देत नाही. मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही, तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ते ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

किरिट सोमय्या यांची पोस्ट

पक्षाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली. यावर नाराज होत सोशल मीडियावर सोमय्या यांनी लिहिले की, पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही, असे सोमय्या यांनी थेट सांगितले. तसेच किरीट सोमय्या यांनी रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी” असे स्पष्ट मत किरिट सोमय्या यांनी व्यक्त केले.

Web Title: Bjp state president chandrasekhar bawankule reaction to kirit somaiya responsibility rejection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • BJP
  • chandrashekar bawankule
  • kirit somaiya
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
1

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
2

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
3

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  
4

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.