Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… त्यामुळे मोठ्या ताईंच्या पोटात दुखू लागले आहे”; भाजप नेत्या चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापले

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होण्यास सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2024 | 09:33 PM
''... त्यामुळे मोठ्या ताईंच्या पोटात दुखू लागले आहे''; भाजप नेत्या चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापले

''... त्यामुळे मोठ्या ताईंच्या पोटात दुखू लागले आहे''; भाजप नेत्या चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापले

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार राज्य सरकार जमा करणार आहे. दरम्यान कालपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या विरोधकांनी ही योजना विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आणली असल्याचा आरोप केला. आता महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांनी बँकेतून पटकन पैसे काढून घ्यावेत असे म्हणत सरकारला डिवचले आहे. यावरून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी सुळेंवर निशाणा साधला आहे.

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होण्यास सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला डिवचले आहे. महिलांनी लगेचच आपल्या खात्यातून पैसे काढून घ्यावेत. सत्ताधारी पक्षातील लोक पैसे परत घेण्याबद्दल बोलत आहेत,. त्यामुळे या सरकारचे काही सांगता येत नाही असे म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारला डिवचले आहे. याला भाजप नेत्या चित्र वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ म्हणाल्या, ”महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे बारामतीच्या मोठ्या ताईंच्या पोटात दुखू लागले आहे. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले त्यांना पाहवत नाही. मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोटंच मोडत बसा. या योजनेचा महाबिगाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केला आहे. खरेतर या योजनेचे खुल्यादिलाने स्वागत करायला हवे होते. मात्र त्यांनी आपली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली. ”

इकडे पैसे जमा होत आहेत आणि तिकडे बारामतीच्या मोठ्या ताईंना पोटशूळ उठलाय…!@supriya_sule @NCPspeaks #माझीलाडकीबहीण #FakeNarrative @Dev_Fadnavis @byadavbjp @AshwiniVaishnaw @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha @BJP4Mumbai pic.twitter.com/pLncB83cUa

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 15, 2024

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ”पक्षात असलेला एखादा आमदाराने गमतीत असे विधान केले तर तर त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला आहे. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आपल्या वाचनाला पक्के आहेत. हे त्यांनी वचनपूर्ती करत दाखवून दिले आहे. अपप्रचार करणाऱ्या या मोठ्या ताईंपासून आणि बाकी विरोधकांपासून सावध राहा.”

Web Title: Bjp women president chitra wagh reply to mp supriya sule criticizing mahayuti government fr mazi ladki bahin yojna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 09:29 PM

Topics:  

  • chitra wagh
  • Mazi ladki bahin yojna
  • supriya sule

संबंधित बातम्या

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
1

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

Manikrao Kokate: “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका
2

Manikrao Kokate: “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका

“त्या हरामखोरानं…; कोंढव्यामधील अत्याचाराच्या घटनेवरुन भाजप आमदार चित्रा वाघ संतापल्या
3

“त्या हरामखोरानं…; कोंढव्यामधील अत्याचाराच्या घटनेवरुन भाजप आमदार चित्रा वाघ संतापल्या

Yugendra Pawar Engagement: पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे; युगेंद्र पवार आणि तनिष्काचा साखरपुडा
4

Yugendra Pawar Engagement: पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे; युगेंद्र पवार आणि तनिष्काचा साखरपुडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.