Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Politics: भाजपचा हिंगोली पॅटर्न: ‘इनकमिंग’ नेत्यांच्या पुनर्वसनाचा पेच सुटणार? निष्ठावंत विरुद्ध आयात संघर्षाची चर्चा

वसमत विधानसभेत आपल्या आक्रमक भाषेतून मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणाऱ्या उज्वलाताई सांभाळे मागील दीड दशकापासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 14, 2026 | 06:13 PM
BJP Hingoli Politics, BJP Maharashtra, Election 2029

BJP Hingoli Politics, BJP Maharashtra, Election 2029

Follow Us
Follow Us:
  • भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या ‘इनकमिंग’नंतर नेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न
  • माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेची संधी देऊन भाजपने ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न
  • संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या इतर दिग्गज नेत्यांच्या मनात उत्सुकता आणि काही प्रमाणात अस्वस्थता कायम
Hingoli Politics: मागील काही वर्षांत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ झाले, अनेक दिग्गज नेते पक्षात दाखल झाले; मात्र त्यांचे राजकीय पुनर्वसन रखडल्याने नाराजीही वाढत होती. आता माजी आमदार रामराव वडकुते यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर ही कोंडी फुटल्याची चर्चा असून हिंगोली जिल्ह्यात पुढील संधी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपाने आगामी २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर या हिंगोली विधानसभा मतदारसंघ मागील १५ वर्षांपासून भाजपाच्च्या ताब्यात असला तरी वसमत आणि कळमनुरी मतदारसंघांमध्ये भाजपाला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे या भागात संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

भैरप्पांच्या तोडीचा कादंबरीकार मराठी साहित्यात अजूनही झालेला नाही -अनुवादक उमा कुलकर्णी यांनी मांडले स्पष्ट मत

घुगे, बांगर, तांभाळे, दांडेगावकर प्रतीक्षेत
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव याच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या उर्वरित कार्यकाळाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे त्याना राज्यसभेवर संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र पक्षाने सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन धनगर आणि हटकर समाजावर प्रभाव असलेल्या रामराव वडकुते यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. मागील दशकात भाजपमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार शिवाजीराव माने आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांसारख्या नेत्यांचा प्रवेश झाला. मात्र लोकसभेची जागा वाटाघाटीत न मिळाल्याने आणि राजकीय पुनर्वसन न झाल्याने या तिन्ही नेत्यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले रामदास पाटील यांनी चार वर्षे मेहनत घेतली. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या विनंतीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला, परंतु नंतर विधान परिषदेसाठीही सथी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडला. या सर्व घटनामुळे भाजपमध्ये पुनर्वसनाचा मुद्दा संवेदनशील बनला होता, वसमत मतदारसधात भाजपाला बळकटी देण्याचे काम अॅड. शिवाजीराव जाधव यांनी केले. जिल्हाध्यक्षपद मिळूनही त्यांना लोकसभा उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, मात्र नंतर पक्षातून बाहेर पडले, तरी त्यांच्या काळात वसमत पंचायत समिती प्रथमच भाजपाच्या ताब्यात आली. ही बाब राजकीयदृष्ट्‌या महत्वाची मानली जाते. सध्या भाजपमध्ये माजी आमदार गजानन घुगे, डॉ. प्रज्ञा सातव, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे, अतिश दांडेगावकर यांसारखे नेते राजकीय संधीच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा आहे.

Pench Tiger Reserve : वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणार ‘AI’, कसं ते जाणून घ्या

 

निष्ठावंत राहिले दूरच

जिल्ह्यातील जुन्या जाणत्या नेत्यामध्ये औंढा नागनाथचे माजी शिक्षण सभापती पांडुरंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य तेजकुमार झांजरी. वसमतचे श्रीकांत देशपांडे, शिवदास बोड्डेवार, हिंगोलीचे अॅड. प्रभाकर भाकरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद चंबल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय सतीश विडोळकर तसेच मोहन भागवत यांचे वर्गमित्र डॉ. पुंजाजीराव गाडे यांच्या नावांचीदेखील अधूनमधून चर्चा होत असते.

महिला नेतृत्व पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

वसमत विधानसभेत आपल्या आक्रमक भाषेतून मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणाऱ्या उज्वलाताई सांभाळे मागील दीड दशकापासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करत आहेत.  वसमत विधानसभा क्षेत्रात आता नवीन नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने भाजपच्या जाणत्या नेतृत्वाकडून उज्वला ताई तांभाळे यांची कधी दखल घेतली जाईल याकडे ताईंच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

राजू नवघरे भाजपाच्या वाटेवर?

वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर यांनी केला आहे. त्यांचा प्रवेश मागील पंधरवड्यात अपेक्षित होता, मात्र काही कारणाने तो लांबला, असे सांगितले जात आहे. या दाव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चाना उधाण आले आहे. एकूणच वडकुते यांच्या राज्यसभा निवडीने भाजपमध्ये राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असून आता हिंगोली जिल्ह्यात पुढील संधी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

सातव यांना मिळणार संधी?

लवकरच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळू शकते, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. असे झाल्यास कळमनुरी मतदारसंघात भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Web Title: Bjps mission 2029 focus on strengthening organization in wasmat and kalamnuri belts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • BJP
  • Hingoli Politics

संबंधित बातम्या

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
1

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी
2

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप
4

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.