Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

BJP MLA Son Missing: हिरानगरमधील एका खाजगी शाळेत शिकणारा आदित्य शर्मा, शाळा सुटल्यानंतर घरी परतला आणि त्या संध्याकाळी परिसरातील दुसऱ्या एका खाजगी शाळेत बॅटमिंटन खेळायला गेला होता. पण रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फोन केला

  • By anuradha sagar
Updated On: Sep 23, 2026 | 12:52 PM
BJP MLA Vijay Sharma, Aditya Sharma Missing, Jammu Kashmir News,

BJP MLA Vijay Sharma, Aditya Sharma Missing, Jammu Kashmir News,

Follow Us
Follow Us:
  • हिरानगरचे भाजप आमदार विजय शर्मा यांचा मुलगा आदित्य बेपत्ता
  • मंगळवारी सायंकाळी बॅटमिंटन खेळायला गेल्यानंतर त्याचा मोबाईल बंद
  • अपहरण व दहशतवादी संबंधांच्या संशयामुळे सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर
BJP MLA Vijay Sharma Son Missing: जम्मू-काश्मीरमधील हिरानगर मतदारसंघाचे भाजप आमदार विजय शर्मा यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पण अवघ्या काही तासात मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आले. आदित्य शर्मा बेपत्ता झाल्यापासून संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती. अपहरण आणि दहशतवादी संबंधांसह सर्व प्रकारचे तर्कवितर्क समोर येऊ लागले. शेवटी पोलिसांच्या पथकाने काही तासात त्याचा शोध घेतला, पोलिसांच्या तपासादरम्यान तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले.

मिळालेल्य माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी आदित्य बॅटमिंटन खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. पण तो बॅटमिंटन खेळून घरी परतलाच नाही. त्याचा फोनही बंद लागत होता. यानंतर तातडीने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विजय शर्मा यांच्या मुलाला शोधण्यासाठी पथकांनी काम सुरू केले. पोलीस, अधिकारी आणि लष्कर या सर्वांचा यात सहभाग होता आणि विविध तर्कवितर्क सुरू झाले.

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची

हिरानगरमधील एका खाजगी शाळेत शिकणारा आदित्य शर्मा, शाळा सुटल्यानंतर घरी परतला आणि त्या संध्याकाळी परिसरातील दुसऱ्या एका खाजगी शाळेत बॅटमिंटन खेळायला गेला होता. पण रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. अकादमीमध्ये फोन केल्यावर तो तिथे गेला नसल्याचे समजले. आदित्यच्या मित्रांनाही फोन करण्यात आले, पण त्याच्या मित्रांनाही त्याची माहिती नव्हती.

संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा

अनेक तास आदित्य कुठेच दिसत नसल्याने विजय शर्मा यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. पोलिसांनी कठुआ आणि जम्मूमध्ये शोधमोहीम सुरू केली आणि परिसरात हाय अलर्ट जारी केला. इयत्ता ११वीचा विद्यार्थी असलेल्या आदित्य कुमारला शोधण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली आणि त्यांनी वेगाने शोधमोहीम सुरू केली.

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह

 पोलिसांना मिळाली माहिती

सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आदित्य दुपारी ४:१५ च्या सुमारास त्याच्या मूळ गावी, हिरानगरहून जम्मूला जाणाऱ्या बसमध्ये चढताना शेवटचा दिसला होता. तो कुठे आहे हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी चालक आणि वाहकाची चौकशी केली आहे. सूत्रांनुसार, तो शेवटचा दिसल्यापासून त्याच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलीस पथकांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले.

बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि शहराबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अखेर तपासादरम्यान तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले. विजय शर्मा हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी यापूर्वी कठुआमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि भाजपच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे राज्य सचिव म्हणून काम केले आहे. ते पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्यही आहेत.

 

Web Title: Jammu kashmir bjp mla vijay sharma son aditya missing found in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • BJP
  • crime news
  • jammu kashmir
  • national news
  • political news

संबंधित बातम्या

Sanjay Shirsat:  छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोखी दिवाळी! मंत्री संजय शिरसाठ आक्रमक
1

Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोखी दिवाळी! मंत्री संजय शिरसाठ आक्रमक

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…
2

Dowry Death Vaijapur: सहा महिन्यांचा संसार अन् ५० हजारांचा हुंडा! छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ वर्षीय शुभांगीने संपवले जीवन…

Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा
3

Manchar Crime: सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण! पतसंस्थेला तब्बल ९.४१ लाखांचा गंडा

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
4

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.