हिंगोलीचे पालकमंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. कथित व्हिडिओ प्रकरण आणि ऑनलाईन बैठका यामुळे राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
वसमत विधानसभेत आपल्या आक्रमक भाषेतून मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणाऱ्या उज्वलाताई सांभाळे मागील दीड दशकापासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करत आहेत.
हिंगोली नगरपालिकेतील अर्थसंकल्पीय बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे या धोरणावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महिला नगरसेविकांच्या ऐवजी त्यांचे कुटुंबीय किंवा नातलग हे अर्थसंकल्पीय बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.
शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासूनच्या (Political News) वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील भाजपविरुद्ध (BJP) एकनाथ शिंदे शिवसेना, अशी लढत होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीशी लढत आहे.
कॉंग्रेस आणि गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या सातव कुटुंबाने पक्षाची साथ सोडली. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक परिरक्षक तसेच प्रत्येक केंद्रावर परीक्षा केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली होती.
महाविकास आघाडीत हिंगोली ही कॉंग्रेसची परंपरागत जागा. तरीही ती राखता आली नाही हा पहिला धक्का. यानंतर खासदार नागेश पाटील यांनी प्रज्ञा सातव आघाडीचा धर्म पाळला नाही, अशी तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाला…