Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थान, मध्यप्रदेश निवडणूक पॅटर्न; महाराष्ट्रासाठी भाजपचा ‘तोच’ मास्टरप्लॅन

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम कऱणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची  मते जाणून घेण्यासाठी भाजपने ही योजना केली  आहे.  राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत या मास्टरप्लॅनचा फायदा झाला होता. आता तीच पद्धत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही  वापरली जाणार आहे.  

  • By anuradha sagar
Updated On: Oct 01, 2024 | 11:45 AM
राजस्थान, मध्यप्रदेश निवडणूक पॅटर्न; महाराष्ट्रासाठी भाजपचा ‘तोच’ मास्टरप्लॅन
Follow Us
Follow Us:

मुंबई:  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठी रणनीती तयार केली आहे. भाजपने 160 जागा लढवण्याचा प्लॅन आखला असून 128 जागा दिल्या जाऊ शकतात.विशेष म्हणजे भाजपने या 160 जागांसाठीही खास प्लॅनिंग केल्याची माहिती  आहे. भाजपकडून या 160जागांवर उमेदवारी निवडीसाठी राजस्थान आणि मध्यप्रदेशात वापरलेला फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हा मध्यप्रदेश आणि राजस्थान पॅटर्न नेमका आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे .

काय आहे राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न?

एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ज्या160 जागा लढवणार आहे त्या 160 मतदारसंघात 160 पक्षनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हे सर्व पक्ष निरीक्षक त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघात पोहचतील आणि मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेतील. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून  नावे मागवली जातील. हे पक्षनिरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या मतदारसंघात किती जण निवडणूक लढवण्यासाठी सक्षम  आहे, याची चाचपणी केली जाईल. या संभाव्य उमेदवारांची नावे आणि  इच्छुकांची नावे आणि त्यांची माहिती एका लिफाफ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात येईल.  160 मतदारसंघातून आलेल्या लिफाफ्यांच्या आधारे संबंधित मतदारसंघातील उमेदवार ठरवला जाईल.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; बडा नेता देणार सोडचिठ्ठी

अशी असेल प्रक्रिया?

भाजपकडून 160 मतदारसंघांमध्ये 160पक्षनिरीक्षक नेमले जातील. हे पक्ष निरीक्षक विधानसभा मतदारसंघातील 100 पदाधिकाऱ्यांकडे हे लिफाफे देतील आणि या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना त्यांच्या मतदारसंघात कोणता उमेदवार हवा, याबाबतची माहिती त्या लिफाफ्यात टाकण्यास सांगतील. यात प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, विशेष निमंत्रित  यांच्यासह , जिल्ह्याच्या विविध मार्च्यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी, खासदार, आमदार यांसारख्या विविध नेत्यांकडून निवडणुकीस पात्र उमेदवारांची नावे घेतली जातील.

त्यानंतर हे लिफाफे परत आल्यानंतर ते  चार पदाधिकाऱ्यांसमोर सीलबंद करून मुंबईतील भाजप कार्यालयात जमा केले जातील. भूपेंद्र यादव आणि चंद्रशेखर बावनकुळे  हे लिफाफे उघडतील आणि त्यातील माहिती घेतील. या लिफाफ्याच्या माध्यमातून संबंधित मतदारसंघातील उमेदवाराचे  नाव निश्चित केले जाईल, असे सांगितले जात आहे.   गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम कऱणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची  मते जाणून घेण्यासाठी भाजपने ही योजना केली  आहे.  राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत या मास्टरप्लॅनचा फायदा झाला होता. आता तीच पद्धत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही  वापरली जाणार आहे.

हेही वाचा: पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने तरुणाला संपवलं;

Web Title: Bjps same master plan for maharashtra after rajasthan madhya pradesh elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • BJP
  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.