Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू होऊन सुमारे दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा सुटलेला नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2026 | 05:55 PM
10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू होऊन सुमारे दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा सुटलेला नाही. आतापर्यंत दहा सर्वसाधारण सभा होऊनही हा विषय वारंवार पुढे ढकलला गेल्याने इच्छुकांची प्रतीक्षा लांबली आहे. मात्र, येत्या शुक्रवारी (दि. २०) आयोजित केलेल्या दोन तहकूब आणि एका नियमित मासिक अशा तीन सभांच्या पार्श्वभूमीवर, या विषयावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. तहकूब सभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय पहिल्या क्रमांकावर असल्याने निवडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

संख्याबळ आणि कोट्याचे गणित

महापालिका निवडणुकीत भाजपने ८४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा येत आहेत.

राष्ट्रवादीची नावे निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील तीन जागांसाठी माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे यापूर्वीच निश्चित करून प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर सादर केला आहे.

भाजपमध्ये अद्याप सस्पेन्स

दुसरीकडे, भाजपच्या सात जागांसाठी अद्याप नावे जाहीर झालेली नाहीत. सत्तेतील वाटेकरी वाढू नयेत आणि विरोधकांची कोंडी व्हावी, यासाठी भाजपकडून निवड लांबणीवर टाकली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांसाठी पक्षात तब्बल दीडशेपेक्षा अधिक इच्छुकांनी दावा ठोकला आहे. यामध्ये माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार, निवडणुकीतून माघार घेतलेले कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विविध हिंदुत्ववादी आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी स्थानिक आमदारांपासून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता

निवड प्रक्रिया लांबल्याने कायदेशीर गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमानुसार, एखादा विषय दप्तरी दाखल झाल्यास तो तीन महिन्यांनी पुन्हा सभागृहापुढे घेता येतो. यापूर्वी फेरप्रस्ताव सादर करण्याची सूचना असतानाही महापौर रवी लांडगे यांनी त्याअगोदरच पत्र दिल्याने हा विषय तीन महिन्यांपूर्वीच विषयपत्रिकेवर आला होता आणि तो तीनदा तहकूब झाला आहे. त्यामुळे तांत्रिक व कायदेशीर पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या विलंबामुळे इच्छुकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर आहे. “महापालिकेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव मान्यतेसाठी आहे. पक्षपातळीवर यासंदर्भात चर्चा पूर्ण होऊन निर्णय निश्चित झाला असून, सभेत नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.” — प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते, भाजप.

हे सुद्धा वाचा : अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

“स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे निश्चित करताना इच्छुकांचे संघटनात्मक काम, सामाजिक योगदान आणि शहराच्या प्रश्नांवरील त्यांचा अनुभव विचारात घेतला जाईल. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार ही नावे महापालिकेकडे सादर केली जातील.” — शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप.
💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवड महापालिकेत किती स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे?

    Ans: पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा येणार आहेत.

  • Que: राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणती नावे निश्चित केली आहेत?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील तीन जागांसाठी माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे निश्चित केली आहेत.

  • Que: भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी किती इच्छुक आहेत?

    Ans: भाजपच्या सात जागांसाठी दीडशेपेक्षा अधिक इच्छुकांनी दावा केला आहे. यामध्ये माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार आणि विविध सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: The selection of nominated corporators for the pimpri chinchwad municipal corporation will take place soon nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • PCMC News

संबंधित बातम्या

Gondiya News: २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक; ३९४ पदे रिक्त, ग्रामीण आरोग्यसेवेचे वास्तव उघड
1

Gondiya News: २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक; ३९४ पदे रिक्त, ग्रामीण आरोग्यसेवेचे वास्तव उघड

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप
2

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
3

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
4

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.