Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये; सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन

माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यावसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा, असे आवाहन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2022 | 04:57 PM
नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये; सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यावसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा, असे आवाहन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी केले.

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत सरन्यायाधीश लळित बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकूर दत्ता, सोलापूरचे रहिवासी असलेले न्यायाधीश एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, विनय जोशी, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे आदी उपस्थित होते.

सरन्यायाधीश लळित म्हणाले सोलापूर ही माझी जन्मभूमी आहे. याठिकाणी माझे शालेय शिक्षण झाले. जन्मगावाचे ऋणानुबंध कायम आहेत, इथले दोस्त, वर्गमित्र यांच्याशी आजही संपर्कात आहे. मी एकोणचाळीस वर्षे वकिली व्यवसायात आहे. मला वकिली व्यवसातून उदंड किर्ती, मान, पैसा सर्व मिळाले. आता सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी जे आहे ते परत करायचे आहे. वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन स्वत:वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे, अडथळे पार होतील. आज निम्म्याहून जास्त युवांची संख्या देशात आहे. येणाऱ्या काळात युवकांच्या हातात देश असेल.

ग्रंथालय आणि पुस्तकांचा आधार घेवूनच आम्ही शिखर गाठले, सध्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला संशोधन, अभ्यासासाठी प्रचंड साधने आहेत. युट्यूबसुद्धा तुम्हाला वकिलांचा युक्तीवाद पाहायला मिळेल, सदैव सचोटीने काम करा, कक्षा भव्य आहेत, असेही सरन्यायाधीश लळित यांनी सांगितले.

सोलापूरचे चार रत्न – सुशीलकुमार शिंदे

माजी केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले, वकिलांनी न्यायालयात न घाबरता वादविवाद करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. सोलापूरच्या मातीतल्या माणसाने न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवल्याने सोलापूरकरांचा उर भरून येतो. चार हुतात्मा यांच्या पद्धतीने सोलापूरचे चार रत्न…उदय लळित, विनय जोशी, एन.जे. जमादार आणि आशितोष कुंभकोणी आहेत. सर्वांनी सामाजिक न्यायासाठी योगदान द्यावे. बार कौन्सिलमधून खेड्यातील, मागास समाजातील वकिलांनी मदत करावी. जिल्ह्यातून आणखी एक मुख्य न्यायाधीश तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.

श्रमाशिवाय ज्ञान वाढणार नाही- दिपांकूर दत्ता

दत्ता यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सरन्यायाधीश लळित यांच्या आठवणी, न्यायालयात ताकदीने आपली बाजू मांडणारे, सामान्यांना न्याय देणारे ते आहेत. नवोदित वकिलांनी सर्व कायद्यांचा अभ्यास काळजीपूर्वक करून कायदे जाणून घ्यावेत. श्रमाशिवाय आपले ज्ञान वाढणार नाही. जीवनाला महत्व देवून नम्रतेने भाषेवर प्रभूत्व वाढवावे, असे न्यायाधीश दत्ता यांनी सांगितले.

पैशासाठी वकिली करू नका- आशितोष कुंभकोणी

सोलापूरचा माणूस न्याय व्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचला, याबाबत नितांत अभिमान आहे. विनम्र स्वभाव, संयमी वृत्तीचे, कोणालाही अपशब्द न बोलणारे, चौकटीबाहेर विचार करणारे सरन्यायाधीश लळित आहेत. त्यांचे गुण नवोदित वकिलांनी घ्यावेत. नवोदितांनी पैशासाठी वकिली करू नये, पैशाकडे लक्ष न देता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करा, असे आवाहन कुंभकोणी यांनी केले.

बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जायभावे यांनी प्रामाणिकपणाला महत्व देऊन समाजाला न्याय द्यावा. निष्पक्ष न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.

वकील परिषदेचे उदघाटन लळित यांनी केले. ॲड. थोबडे यांनी प्रास्ताविकातून बार कौन्सिलची माहिती आणि कार्याचा आढावा घेतला. बार कौन्सिलतर्फे शिक्षण, कार्यक्रमांची शिबीरे घेऊन नवोदित वकिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 15 वर्षात 500 शिबीरे घेतली, ज्यांना बार आणि बेंचची आवड त्यांना मार्गदर्शन केले. महिला दिनाला महिलांविषयी गुन्हे याबाबत शिबीर घेऊन जागृती केली. बार कौन्सिलचे डिजीटायजेशन केले असून सर्वांना यामार्फत सेवा दिली जाणार आहे, असे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ई-गव्हर्नन्सचे प्रकाशन केले. लळित यांच्या हस्ते बार कौन्सिलच्या डिजीटायजेशनचे कळ दाबून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी लळित कुटुंबातील सदस्य सविता लळित यांनी लळित कुटुंबातील चार पिढ्या वकिलीमध्ये असल्याचे सांगितले. यावेळी सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, सरन्यायाधीश यांचे वडील निवृत्त न्यायमुर्ती उमेश लळित, पत्नी अमिता लळित, श्रीमती झूमा दत्ता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आदींसह वकिल उपस्थित होते.

Web Title: Budding lawyers should not fear the obstacle course appeal of chief justice uday lalit nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 04:57 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Sushilkumar shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.