Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर

Buldhana New EVM Machines for elections: बुलढाणा जिल्ह्यासाठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन एस-३ मॉडेलच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 03, 2026 | 05:56 PM
Buldhana New EVM Machines for elections

Buldhana New EVM Machines for elections

Follow Us
Follow Us:
  • एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ
  • बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर
  • चाचणीसंदर्भात कार्यशाळा
बुलढाणा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी नवीन एस-३ मॉडेलच्या इव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक मशीनच्या वापरामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.

नवीन एस-३ इव्हीएम मॉडेलचा वापर, त्याची कार्यपद्धती, चाचणी, हाताळणी तसेच मतदान प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर त्याचा प्रभावी वापर याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक आयोगाचे अवर सचिव शैलेंद्र वन्हाडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे अभियंते, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी, निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मतदान प्रक्रिया अधिक विश्वासार्ह, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यावर निवडणूक आयोगाचा भर आहे. त्याच अनुषंगाने नवीन एस-३ ईव्हीएम मशीनची रचना, वैशिष्ट्ये, कार्यप्रणाली, तांत्रिक बाबी तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान मशीनचा वापर कशा पद्धतीने करावा, याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, नवीन ईव्हीएम मशीनमुळे मतदान केंद्रावरील प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासोबतच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. मशीनची योग्य हाताळणी आणि कार्यपद्धतीची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व बाबींची पूर्वतयारी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कार्यशाळेदरम्यान ईव्हीएमच्या तांत्रिक बाबी, मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे आणि मशीनच्या वापराबाबत सादरीकरण करण्यात आले.नवीन एस-३ ईव्हीएमचा वापर हा मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जबाबदारी अचूकपणे पार पाडणे आवश्यक

निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे आवश्यक आहे. नवीन ईव्हीएम यंत्रणेची कार्यपद्धती प्रत्यक्ष प्रशिक्षणातून आत्मसात करून निवडणुकीच्यावेळी तिचा योग्य व प्रभावी वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शंकाचे केले निरसन

  • कार्यशाळेत नवीन एस-३ ईव्हीएम मशीनची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. मशीन सुरू करण्यापासून मतदानाची नोंद, विविध प्रक्रियात्मक बाबी, मशीनची सुरक्षित हाताळणी तसेच मशीनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सुविधांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
  • तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मशीनच्या वापराची चाचणी घेण्यात आली. ईव्हीएमच्या वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचेही यावेळी निरसन करण्यात आले.
    जुन्या मशीनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे मशीन बंद पडणे, नादुरुस्ती अशा चारवार घटना होत होत्या.
  • निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या जुन्या ईव्हीएम मशीनच्या तुलनेत नवीन तंत्रज्ञानावर आधारित एस-३ मॉडेलच्या मशीन इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैदराबाद यांच्याकडून घेण्यात आल्या आहेत.
  • बुलढाणा जिल्ह्यासाठी ३ हजार कंट्रोल युनिट आणि ६ हजार बैलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  • आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या मशीनचा वापर करण्यापूर्वी त्यांची याचणी, तपासणी आणि संबंधित अधिकारी-कर्मचान्याचे प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे.
धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Web Title: Buldhana new s3 evm machines maharashtra election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • buldhana news
  • EVM Machine

संबंधित बातम्या

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
1

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
2

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
3

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
4

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.