
photo- social media
देऊळगाव राजा: अल निलोच्या संकटामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्यात येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाईची शक्यता निर्माण होणार आहे. प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात अशा सुचना सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी स्थानिक व्यंकटेश कॉलेजमध्ये आयोजित चारा व पाणीटंचाई आढावा बैठकीदरम्यान दिल्या.
या बैठकीला सिंदखेड राजा महसूल उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, नायब तहसीलदार सायली जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ, दादाराव मसूदवाल, महावितरणचे नागरे यांच्यासह जलसंध्धारण व पाणीपुरवठा तसेच कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा कमी आहे. विहिरी, बोरवेलची पाणी पातळी खालावली. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चपासूनच अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
तालुक्यातील सर्व गावांचा पाणीटंचाई आराखडा तात्काळ तयार करावा, चारा, पाण्याची साठवणूक करावी व चारा डेपो, चारा छावण्या सुरू करण्यासाठी जागा निक्षित कराव्यात. चान्याची अवैध वाहतूक व साठेबाजी रोखण्यासाठी चारा नियंत्रण आदेश लागू करावा. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर अधिग्रहण व टैंकर नियोजन करावे. त्याचबरोबर खडकपूर्णा प्रकल्पातून चोरट्या मागनि मोठ्या प्रमाणात होणारा पाणी उपसातात्काळ थांबून अवैधरित्या टाकलेले विद्युत पंप बंद करण्यात यावे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना पाणी व चाऱ्यासाठी वणवण भटकावे लागू नये यासाठी प्रशासनाने आताच सतर्क होण्याची गरज असल्याने वेळप्रसंगी शेतकऱ्यांसमोर कुठलेही संकट उभे राहू नये, असे सांगितले. यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावर्षी पिण्याच्या पाण्याची संभाव्य पाणीटंचाई पाहता सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील ज्या खाजगी विहिरीना पाणी आहे, अशा विहिरी देखील पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण करण्तर असल्याचे आमदार कोयदे यांनी सांगितले.
MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा