बारामती : मुंबई महापालिकेमध्ये कोविड घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावरही विरोधकांनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. पण असे आरोप विरोधकांकडून होत असतात. कोणीही आरोप करतं, ज्यात काही तथ्य नाही, असेही आरोप केले जातात. पण तथ्य असेल तरच त्या आरोपाची दखल घेतली जाते. असं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
दरम्यान याच वेळी त्यांना नवाब मलिक यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला कुणाचाही विसर पडत नाही. आम्ही कुणाची काळजी घ्यायची असते ती योग्यवेळी घेत असतो.
राजधानी मुंबईनंतर आता पुण्यात करोनाच्या नव्या व रियंटचे सात रुग्ण आढळले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितलं असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील त्याची माहिती घेण्यास सांगितलं आहे. मुंबईला गेल्यावर अधिक चर्चा करुन आणि आवश्यकता असल्यास जनतेला त्यासंदर्भात काळजी घेण्यासाठी सूचना देऊ. असही अजित पवार हे म्हणाले.
[read_also content=”बैलगाडा शर्यत हे भारताचे सांस्कृतिक वैभव : प्रकाश जावडेकर https://www.navarashtra.com/maharashtra/bullock-cart-race-is-the-cultural-glory-of-india-prakash-javadekar-nrdm-286276.html”]
ओमायक्रॉनचे BA4 आणि BA5 हे सब व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोना केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. जगातील विविध देशांमध्ये BA4चे जवळपास 700 पेक्षा अधिक रुग्ण तर 17 देशात BA5चे 300 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचे विषाणूचे हे सब व्हेरिएंट संसर्गजन्य असले तरी ते घातक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण असं असलं तरी नागरिकांनी काळजी घेणे आणि सतर्क राहणे अधिक गरजेचे आहे. त्यासोबतच आरोग्य विभागालाही नव्या व्हेरिएंटची चौकशी करण्यास सांगितले असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.