Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Gaikwad : आमदारांना शिळं अन्न देणं भोवलं! थेट कॅन्टीनचा परवाना करण्यात आला रद्द

Sanjay Gaikwad canteen license cancelled : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना शिळे अन्न देणाऱ्या आमदार निवासमधील कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 10, 2025 | 12:08 PM
canteen license revoked served stale food to MLA Sanjay Gaikwad at MLA residence

canteen license revoked served stale food to MLA Sanjay Gaikwad at MLA residence

Follow Us
Follow Us:

Sanjay Gaikwad canteen license cancelled : मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी कॅन्टीन चालकाला जोरदार मारहाण केली. यामध्ये संजय गायकवाड यांना शिळे अन्न दिल्यामुळे त्यांना राग अनावर झाला. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जोरदार मारहाण केली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधकांनी यावरुन जोरदार टीका केल्यानंतर देखील आमदार संजय गायकवाड यांना कोणताही पश्चत्ताप नसल्याचे दिसून आले आहे. आता सदर कॅन्टीनवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून परवाना रद्द करण्यात आला आहे.

नेमकं झालं काय?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवास येथे मुक्कामास होते. कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ते असलेल्या रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला कृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॅन्टीन चालकाला त्यांनी बोलावून घेत दिलेल्या अन्नाचा वास घेण्यास सांगितले. अन्न खराब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. मात्र त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाच्या थेट कानशिलात लगावली. सलग एका मागून एक बुक्क्या देखील मारल्या. या प्रकरणावरुन आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावरुन विधीमंडळामध्ये देखील आवाज उठवण्यात आला.  संजय गायकवाड यांनी टॉवेल आणि बनियानवर बाहेर येत कॅन्टीन चालकाला जाब विचारला. याचबरोबर त्यांनी खराब झालेल्या डाळेचा त्यांना वास देखील घ्यायला लावला. यानंतर एका मागोमाग एक बुक्क्या संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मारल्या. त्यामुळे संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात असून याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र कॅन्टीनवर कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आकाशवाणीमधील या कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टिन चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी सदर कॅन्टीनचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार संजय गायकवाड यांना शिळे अन्न दिल्यानंतर त्यांनी कारवाईची मागणी केली होती. या कॅन्टीनमधील अन्नाचे नमुने हे चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Canteen license revoked served stale food to mla sanjay gaikwad at mla residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • political news
  • Sanjay Gaikwad

संबंधित बातम्या

Fact-Check पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी खरंच लग्न केलं आहे का? बातमी खरी की खोटी?
1

Fact-Check पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी खरंच लग्न केलं आहे का? बातमी खरी की खोटी?

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर
2

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
3

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
4

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.