Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज; म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंसाठी सहन करतो…’

संभाजीनगरचे भाजपचे स्थानिक नेते राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. मात्र यावर शिवसेना ठाकरे गटाचे तेथील नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 07, 2024 | 05:40 PM
राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे नाराज

राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे नाराज

Follow Us
Follow Us:

मुंबई : ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या संभाजीनदर दौऱ्यावर आहेत. येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज शिवबंधन बांधले.  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मात्र ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे या पक्षप्रवेशावर नाराज असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

त्यांनी शिवसेना विरोधात भूमिका घेतली होती 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील प्रवेश वाढले आहे. भाजपचे राजू शिंदे यांनी देखील ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे माजी चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली. खैरे म्हणाले, “राजू शिंदे यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की तुम्हाला आमच्या पक्षात यायचं असेल तर लवकर या. लोकसभा निवडणुकीच्या आधी या. परंतु, ते लोकसभा निवडणुकीच्या काळात तिकडेच थांबले. निवडणुकीनंतर त्यांनी एक वक्तव्य केलं की महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना त्यांच्यामुळे 25 हजार मतं अधिक मिळाली. त्यांनी भुमरेंना मतं मिळवून दिली. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाडलं. आता उद्धव ठाकरे हे राजू शिंदे यांना आपल्या पक्षात घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राजू शिंदेंमुळे माझा पराभव – चंद्रकांत खैरे

पुढे चंद्रकांत खैरे म्हणाले, राजू शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं आहे. त्यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेत टीका केली आहे. तरीही त्यांच्या पक्षप्रवेश होत आहे.  उद्धव ठाकरे हे त्यांचा पक्षप्रवेश करुन घेत आहेत त्यावर माझी हरकत नाही, कारण आम्ही उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबरोबर आहोत. परंतु, कुठलाही नवा माणूस कार्यकर्त्यांच्या मनात रुजवणं अवघड असतं. बाहेरचा माणूस आणायचा आणि कार्यकर्त्यांच्या मनात त्याला स्थान मिळवून द्यायचं हे सोपं नसतं. उद्धव ठाकरेंच्या इच्छेमुळे आम्ही हे सगळं सहन करू. राजू शिंदेंमुळे माझा मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे.” अशी नाराजी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Chandrakant khaire leader of the thackeray group in sambhajinagar is upset with raju shinde entry in shivsena nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Chandrakant Khaire
  • Sambhajinagar Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
1

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
2

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
4

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.