Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

ब्रह्मपुरी तालुक्यातील तब्बल २६ ग्रामसभांनी सामूहिक वनहक्क (सीएफआर) उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रश्न आणि कामांना गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे. सामूहिक वनहक्क उपक्रमामुळे गावपातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना त्याचा थेट आर्थिक लाभ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 02:53 PM
Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Follow Us
Follow Us:
  • CFRच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील २६ ग्रामसभांनी एकत्र येत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
  • प्रलंबित कामे आणि ग्रामसभांच्या अडचणींचा आगामी कंवर्जन्स बैठकीत आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
  • गावातच रोजगार मिळाल्याने तेलंगणा, कर्नाटक आणि इतर भागात होणारे स्थलांतर कमी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ब्रह्मपुरी: सामूहिक वनहक्क (सीएफआर) उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रश्न आणि कामांना गती मिळावी, यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील तब्बल २६ ग्रामसभांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. सीएफआरशी संबंधित विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी चिमूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला बुधवारी भेट देत प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्याशी सविस्तर चचर्चा केली.

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

‘राधा ऑर्गनायझेशन’च्या समन्वयातून झालेल्या या भेटीत संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरिदास तुपटे यांनी २६ ग्रामसभांचे प्रतिनिधित्व करत ग्रामस्थांच्या विविध समस्या, मागण्या तसेच सीएफआर कामांमधील प्रशासकीय अडचणी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून ग्रामसभांना आवश्यक प्रशासकीय सहकार्य मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  (फोटो सौजन्य – AI Created) 

कंवर्जन्स बैठकीकडे लक्ष बैठकीत सीएफआर कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, रोजगाराच्या संधी आणि ग्रामसभांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्प अधिकारी कुमरे यांनी ग्रामसभांच्या प्रतिनिधींचे म्हणणे जाणून घेत संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. या प्रश्नांचा आगामी कंवर्जन्स बैठकीत आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामसभा प्रतिनिधींनी व्यक्त केली.

स्थानिक रोजगारामुळे स्थलांतराला आळा

सामूहिक वनहक्क उपक्रमामुळे गावपातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना त्याचा थेट आर्थिक लाभ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पिकांच्या हंगामात रोजगाराच्या शोधात तेलंगणा, कर्नाटक तसेच इतर भागात होणारे स्थलांतर सीएफआरअंतर्गत उपलब्ध झालेल्या रोजगारामुळे कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. राधा ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने अनेक कुटुंबांना गावातच नियमित रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. ‘गावातच रोजगार उपलब्ध झाला, तर स्थलांतराची गरज भासत नाही,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

ग्रामसभांच्या संघटित पाठपुराव्याला बळ

स्थानिक वनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामसभा सक्षम होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने २६ ग्रामसभांनी एकत्रितपणे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने सीएफआर उपक्रमांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामसभांच्या या प्रयत्नांना राधा ऑर्गनायझेशनकडून सातत्याने मार्गदर्शन व समन्वय मिळत असून, वनहक्काच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Brahmapuri cfr initiative 26 gram sabhas unite to push for forest rights work and local employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
1

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
2

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
3

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
4

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.