Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

गिधाडांच्या योग्य संवर्धनासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. नियमित होणाऱ्या नोंदींवरून राज्यात सध्या सुमारे १०० गिधाडेच उरली असल्याचे स्पष्ट होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2026 | 02:36 PM
Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Follow Us
Follow Us:
  • गिधाडांच्या मृत्यूत मलेरियाचा वाटा: गेल्या २० वर्षांत एव्हियन मलेरियामुळे शेकडो गिधाडांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
  • राज्यात फक्त १०० गिधाडे: नियमित नोंदीनुसार महाराष्ट्रात सध्या सुमारे १०० गिधाडेच उरल्याची माहिती समोर आली आहे.
  • संवर्धनाची तातडीची गरज: अधिवासाचे संरक्षण, अन्नाची उपलब्धता आणि आजारांपासून बचावासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
चंद्रपूर: गिधाडांच्या संख्येत होत असलेल्या चिंताजनक घटीमागे केवळ डायक्लोफेनाकसारखी औषधे कारणीभूत नसून एव्हियन मलेरियासारखे संसर्गजन्य आजार आणि भूकबळीही त्यांच्या मृत्यूची महत्त्वाची कारणे ठरत आहेत. गत २० वर्षांत मलेरियामुळे शेकडो गिधाडांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच गिधाडांच्या योग्य संवर्धनासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही प्रजाती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत. भारतात सुमारे २० वर्षांपूर्वी गिधाडांची संख्या चांगली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. त्यामुळे भविष्यात गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

गिधाडे ही निसर्गातील महत्त्वाची सफाई व्यवस्था मानली जातात. एखादे जनावर मृत पडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गिधाडे त्याचे मांस फस्त करतात. काही वेळात केवळ सांगाडा शिल्लक राहतो. त्यामुळे मृत जनावरांची नैसर्गिकरीत्या विल्हेवाट लागते. याच कारणामुळे गिधाडांना ‘निसर्गाचे सफाई कामगार’ म्हटले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध संसर्गजन्य आजारांमुळे गिधाडांची संख्या घटत आहे. त्यातच भूकबळीची भर पडली आहे. अन्नाची उपलब्धता कमी होणे, आजारांचा वाढता प्रादुर्भाव आणि संवर्धनासाठी अपुरे प्रयत्न यामुळे गिधाडांसमोरील संकट अधिक गडद झाले आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

राज्यात सुमारे १०० गिधाडेच उरली

नियमित होणाऱ्या नोंदींवरून राज्यात सध्या सुमारे १०० गिधाडेच उरली असल्याचे स्पष्ट होते. राज्याच्या सीमावर्ती भागातील गिधाडे अन्नाच्या शोधात इकडून-तिकडे जाणे-येणे करतात. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गिधाडे आढळतात. चंद्रपूरसह कोकणातही गिधाडांची नोंद झाली आहे. मात्र, राज्यातील इतर भागांत गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी अपेक्षित प्रवत्न होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

मलेरियामुळे मृत्यूत वाढ, अहवालातील निष्कर्ष

गडचिरोलीतील संकटग्रस्त गिधाडांच्या मृत्यूमध्ये पक्ष्यांना होणाऱ्या मलेरियाचा मोठा वाटा असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. चंद्रपूर-गडचिरोलीच्या घनदाट जंगलात पक्षीतज्ज्ञ डॉ. अजय पोहरकर यांच्या नेतृत्वाखाली गिधाडांच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात गिधाडांच्या मृत्यूमागील विविध कारणांचा वेध घेण्यात आला. राज्यात प्रामुख्याने पांढऱ्या पाठीची, लांब चोचीची आणि पातळ चोचीची गिधाडे आढळतात. मात्र, या तिन्ही प्रजातींची संख्या कमालीची घटली आहे. गिधाडांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, अन्नाची उपलब्धता आणि आजारांपासून संरक्षण यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur gadchiroli vultures facing extinction threat avian malaria food scarcity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा
1

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
2

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
3

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
4

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.