Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती देण्यात आली आहे. गडचांदूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ व मधून ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जाच्या छाननीदरम्यान त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 02:48 PM
Chandrapur News: जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Chandrapur News: जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • ५ जागांसाठीच्या निवडणुका स्थगित
  • निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम
  • उमेदवारांनी घेतली होती न्यायालयात धाव
आरक्षण उल्लंघनाच्या कारणावरून शुक्रवारी (दि. २८) सर्वोच्च न्यायालयाने नगर परिषद आणि नगर परिपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिला असतानाच राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस, मूल आणि गडचांदूर नगर परिषदांमधील एकूण ५ जागांसाठीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ज्या ५ नगरपरिषद जागांना स्थगिती देण्यात आली आहे, त्यात घुग्घूस नगर परिषदेच्या ३ आणि मूल आणि गडचांदूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या जागांसाठीच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Raj Thackeray News: साधुंच्या नावाखाली लाडक्या उद्योगपतींच्या घशात जमीन;तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, राजुरा, गडचांदूर आणि घुग्घूस या १० नगर परिषदांसाठी २ डिसेंबर निवडणुका होत आहेत. तसेच भिसी नगर पंचायतमध्येही या निवडणुका आहेत. या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेदरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या सर्व अर्जाची छाननी करण्यात आली आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यानंतर निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली. जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला होता. तेव्हा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक जिल्हा प्रशासनाला घुग्धूस, मूल आणि गडचांदूर नगर परिषदांमधील एकूण ५ जागांसाठी निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट केले की, सादर केलेल्या नामांकन पत्रांची छाननी केल्यानंतर काही उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले, न्यायालयाने याचिकांवर सुनावणी केली.

या प्रभागातील निवडणुका पुढे ढकलण्यात राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय घेण्यास विलंब झाला, ज्यामुळे अपील करणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. त्यांचे अर्ज मागे घेतल्यानंतर, सर्व उमेदवारांना आयोगाने प्रचारासाठी दिलेला वेळ मिळावा. तथापि, अपील करणाऱ्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय मिळण्यास विलंब झाल्यामुळे आयोगाच्या प्रचार कालावधीवर परिणाम झाला, परिणामी संबंधित प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये गडचांदूर नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक ८ ब, मूल नगर परिषेदचा प्रभाग क्रमांक १० ब आणि घुग्घूस नगर परिषदेचा प्रभाग ५ ब, ७ अ आणि ९ अ यांचा समावेश आहे.

नवी मुंबईत मासेमारी संकटात! गारठा वाढल्याने मासळीचे दर कडाडले; सुरमई, पापलेट ₹ १,००० पार

या उमेदवारांनी घेतली होती न्यायालयात धाव

गडचांदूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ व मधून अस्मान नवाज बैग, मल्लिक सुजाता सुजित, संगीता गुरुदास मून, शेख रजिया सुलतान खाजा, शकीला शेख आणि मंगला सत्यवान हिरदेव या ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जाच्या छाननीदरम्यान त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले, त्यामुळे त्यांनी सर्वांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, मुलमधील प्रभाग क्रमांक १० व मधून काँग्रेसचे राहुल पेमलवार आणि भाजपचे नीलेश देवराव रॉय यांनी अर्ज दाखल केले होते. ही जागा सर्वसामान्यांसाठी आहे, मतदार यादीत रॉय यांचे आडनाव रायकंटवार असे कसे आले, असा प्रश्न विचारून दुसऱ्या उमेदवाराने निवडणूक अधिका-यांकडे अपील दाखल केले होते. नंतर न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. न्यायालयाचा निर्णय जारी झाला असतानाही निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय वेळेत झाला नाही. त्यामुळे या सर्व मतदारसंघामधील निवडणुका पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Web Title: Chandrapur news supreme court issues stay on five municipal council seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Local Body Election 2025
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?
1

Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?

Chandrapur: चंद्रपूर-यवतमाळ सीमेवरील पैनगंगा नदीच्या घाटावर अद्याप पूल नाही; ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास
2

Chandrapur: चंद्रपूर-यवतमाळ सीमेवरील पैनगंगा नदीच्या घाटावर अद्याप पूल नाही; ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली
3

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली

Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?
4

Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.