Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?

सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. कर्जमाफीबाबत अद्याप शासनाने योजना जाहीर केलेली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2026 | 02:19 PM
Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?

Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?

Follow Us
Close
Follow Us:
  • 3.5 लाख शेतकऱ्यांचे भवितव्य अधांतरी! कर्जमाफीच्या निर्णयाकडे चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष
  • कर्जाचा आकडा 34 हजार कोटींवर; शेतकरी आंदोलनाच्या तयारीत, सरकार निर्णय कधी घेणार?
  • ‘सातबारा कोरा’चे आश्वासन हवेतच?
चंद्रपूर: जिल्ह्यातील लाखो शेतकरी गत अनेक महिन्यांपासून कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची या संख्या ३.५ लाखांच्या घरात असून या शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून केव्हा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर २८ ऑक्टोबर २०२५ ला ३० हजार ५०० कोटी रुपये कर्ज होते. नंतर हा आकडा फुगून ३४ हजार ४७७ कोटी झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नंतर जीवनयात्रा संपविली. असे असले तरी शासनाचे पोर्टल अद्याप सुरू झालेले नाही. शिखर बँकेने तूर्तास थकीत बाकी शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविली असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Raigad News: मुरुड एसटी आगारात CNG पंपाला नकार! प्रवाशांनी व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

निवडणुकांच्या काळात सत्ताधारी पक्षांकडून संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. जिल्ह्यात यावर्षी सततच्या अतिवृष्टी, काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती, कीड व रोगराई यामुळे कापूस, धान, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी संघटनांकडून आंदोलने करण्यात आली आहेत. चंद्रपूर शहरासह वरोरा, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी तालुक्यांत शेतकऱ्यांनी निदर्शन करत कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. काही ठिकाणी चक्काजाम आंदोलनही करण्यात आले. सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

बँकांनी सुरू केले माहिती देणे

कर्जमाफीबाबत अद्याप शासनाने योजना जाहीर केलेली नाही. प्रथम सकृतदर्शनी थकीतबाकी खात्यांची माहिती शासनाला पाठविली जात आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७९ हजार खात्यांची माहिती अपलोड केली असून इतर बँकांमार्फत माहिती देणे सुरू आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

निर्णयाबाबत अद्याप अनिश्चितता

दरम्यान, प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांची नोंद घेण्यात येत असून शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष निर्णय केव्हा होणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी जाहीर करावी, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.

मुंबई महापालिका बजेटमधील ‘आरोग्य डिजिटल क्रांती’वर प्रश्नचिन्ह! जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा?

सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा शब्द दिला होता. तसेच २९ ऑक्टोबर २०२५ ला शेतकरी नेत्यांसोबत आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी सातबारा कोरा करून देण्याचे मान्य केले होते. सरकारने ३० जून २०२५ पर्यंतचे संपूर्ण कर्ज संपवून सातबारा कोरा करावा.- अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार

शेतकऱ्यांच्या मते, सध्या शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. बियाणे, खत, कीटकनाशके, मजुरी, सिंचन आणि वाहतूक यांचा खर्च सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, पिकाला हमीभाव मिळत नसल्याने उत्पन्न घटत आहे. या परिस्थितीत कर्जमाफी हा एकमेव दिलासा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कर्जमाफी केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याला आधार देणारी गरज आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मानसिक तणावात असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Farm loan waiver decision pending 35 lakh farmers in chandrapur await relief will loans be cleared chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Farmers
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, मजुरांचा मोठा तुटवडा; बाजारभावाचाही फटका
1

कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, मजुरांचा मोठा तुटवडा; बाजारभावाचाही फटका

शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत? आढळराव पाटलांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा
2

शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत? आढळराव पाटलांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा

Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित
3

Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित

Chandrapur Crime: चंद्रपूर हादरलं! भीम जयंती मिरवणुकीत DJ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; 5 जण अटकेत
4

Chandrapur Crime: चंद्रपूर हादरलं! भीम जयंती मिरवणुकीत DJ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; 5 जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.