Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur: चंद्रपूर-यवतमाळ सीमेवरील पैनगंगा नदीच्या घाटावर अद्याप पूल नाही; ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास

Chandrapur-Yavatmal सीमेवरील Painganga Riverवरील गांधीनगर–तेजापूर घाटावर आजही पूल नाही. नागरिकांना नावेतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. बॅरेज कम पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 03:38 PM
chandrapur (फोटो सौजन्य: social media)

chandrapur (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वातंत्र्यानंतरही पैनगंगा नदीवर पूल प्रलंबित.
  • विद्यार्थ्यांना, रुग्णांना व शेतकऱ्यांना मोठा फटका.
  • बॅरेज बंधारा कम पूल उभारण्याची जोरदार मागणी.
चंद्रपूर: मागणी नसताना ही आवश्यकता नसलेल्या अनेक स्थानी उड्डाण पूल, महामार्गाची निर्मिती केली जात आहे. मात्र ग्रामीण भागातील दळणवळणाची विशेष आत्मा असलेले रस्ते, पूल दुर्लक्षित पडले आहे. यापैकी एक असलेल्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील गांधीनगर (कोडशी बू.) तेजापूर या महत्त्वाच्या नदी घाटावर स्वातंत्र्याला अनेक दशके लोटूनही अद्याप पुलाची निर्मिती झालेली नाही. परिणामी परिसरातील नागरिकांना आजही जीव मुठीत धरून नावेतून प्रवास करावा लागत आहे.

बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना

तालुक्यातील गांधीनगर (कोडशी बू.) आणि वणी तालुक्यातील तेजापूर या गावांदरम्यान नदीचे अंतर अवघे २ किलोमीटर असले तरी पुलाअभावी ग्रामस्थांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर पडत आहे. विशेषतः विद्यार्थी, रुग्ण व शेतकरी यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. या नदी घाटावर पूल उभारण्यात आल्यास यवतमाळ जिल्ह्यातील वणी व झरी तालुक्यातील ग्रामस्थांना कमी अंतरात सुरक्षित प्रवास करता येईल, कोरपना-जिवतीमार्गे तेलंगणा राज्यापर्यंत थेट संपर्क मार्ग उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने यात लक्ष घालून पुलाची निर्मितीसाठी पाऊले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नाल्यांवरील पुलांचा मोठा अनुशेष
कोरपना तालुक्यातील अनेक मार्गांवर नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होते. यात कोडशी खुर्द, पिंपरी, धोपटाळा, शेरज बुज, कोडशी बुज, कोडशी खुर्द, पिंपरी, शेरज बुज, कोरपना, कुसळ, हातलोणी, घाटराई, कोरपना, कन्हाळगाव, धानोली, पिपडा, कुसळ, पिपर्दा, कारगाव बुज, पाटागुडा, कोल्हापूरगुडा, मायकलपूर, भोईगुडा, जेवरा, कन्हाळगाव, श्रीकृष्ण मंदिर, हेटी, शेरज बुज या मार्गावरील नाल्यावर पुलाची मागणी केली आहे.

बॅरेज बंधारा कम पुलाची अपेक्षा
ग्रामस्थांकडून गांधीनगर तेजापूर नदी घाटावर साध्या मुलाऐवजी बॅरेज बंधारा कम पूल उभारण्याची जोरदार मागणी होत आहे. असा प्रकल्प साकार झाल्यास परिसरातील शेती संचनाला मोठा फायदा होईल. तसेच उद्योगांना पाणीपुरवठा पुलभ होऊन उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई मोठ्या नमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पूल कोणत्या ठिकाणी प्रलंबित आहे?

    Ans: चंद्रपूर–यवतमाळ सीमेवरील गांधीनगर (कोडशी बू.)–तेजापूर नदी घाटावर.

  • Que: नागरिकांना कोणत्या अडचणी येतात?

    Ans: नावेतून धोकादायक प्रवास, मोठा वळसा, वेळ व पैशाचा अतिरिक्त खर्च.

  • Que: ग्रामस्थांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: साध्या पुलाऐवजी बॅरेज कम पूल उभारून कायमस्वरूपी दळणवळण सुविधा द्यावी.

Web Title: Chandrapur there is still no bridge on the painganga river ghat on the chandrapur yavatmal border villagers are forced to travel with their lives in their hands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Chandrapur

संबंधित बातम्या

Chandrapur News: मूल तलावावर मालधक्का प्रकल्पाचे सावट; पर्यावरण आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर संकट
1

Chandrapur News: मूल तलावावर मालधक्का प्रकल्पाचे सावट; पर्यावरण आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.