Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी…

विवाह सोहळ्यांमुळे काही ठिकाणी मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 24, 2025 | 01:20 PM
Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी...

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी...

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या शुभमुहुर्तामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता
  • लोकशाही आणि परंपरेची कसोटी
  • बल्लारपूर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदांसह जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, याच दिवशी विवाहासाठी देखील शुभमुहूर्त असल्याने अनेक कुटुंबे विवाहसोहळ्यांच्या तयारीत गुंतणार आहेत. परिणामी, मतदार मतदान केंद्राकडे वळणार की लग्नसमारंभांकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लग्नाच्या शुभमुहुर्तामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Raigad News: जेष्ठांना मिळणार 7 हजार रुपयांचे मानधन; अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेत दिली माहिती

लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे मतदान. त्यामुळे नागरिकांनी प्रथम मतदानाचे कर्तव्य पार पाडून त्यानंतरच विवाहसोहळ्यांकडे वळावे. या संदेशांसह व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे २ डिसेंबर ही तारीख एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी ठरणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

मतदान टाळल्यास उमेदवार निवड आणि लोकशाहीच्या भविष्यावर होणारा परिणाम गंभीर ठरू शकतो. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर जबाबदारी आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी ‘प्रथम मतदान, नंतर मंगलकार्य’ असा निर्धार व्यक्त केला आहे. सामाजिक संस्था आणि स्थानिक नेते नागरिकांना आवाहन करीत आहेत की, विवाह सोहळ्याला जाण्यापूर्वी सकाळीच मतदान करून हक्क बजवावा. काहींनी सकाळी ७ वाजता कुटुंब, नातेवाइकांसह मतदान केंद्रावर जाण्याची तयारी केली आहे. मात्र, ज्यांचे विवाह ठरले आहेत, त्यांना पहाटे निघावे लागणार असल्याने काही ठिकाणी मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपरीषद आता निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विवाहाचा हंगाम आणि बाहेरील नागरिकांची गर्दी

स्थानिक लग्न समारंभ मंडळे, हॉल व्यावसायिक आणि भोजन व्यवस्था करणारे सांगतात की, २ डिसेंबर हा हंगामातील सर्वाधिक मागणी असलेला शुभ दिवस आहे. अनेक कुटुंबे विवाहासाठी गावाबाहेर जाणार असल्याने पाहुण्यांची ये-जा, वरात व्यवस्था आणि समारंभातील धांदल यामुळे मतदानासाठी वेळ मिळणे कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो.

बल्लारपूर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान

जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी ८ महिलांनी एकमेकीविरुद्ध दंड थोपटले आहे. यावेळी नगराध्यक्षपदाची निवड थेट मतदारांतून होत असल्याने पहिल्यांदाच महिलेला संधी मिळणार आहे. यापूर्वी बल्लारपूर नगरपालिकेच्या इतिहासात तीनदा नगराध्यक्ष थेट मतदारांतून निवडून आले असून यावेळी चौथ्यांदा मतदारांना थेट नगराध्यक्ष निवड करावी लागणार आहे.

मुंबई लोकलचा होणार कायापालट! मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी १० ते १२ लोकल फेऱ्यांची वाढ, हार्बर मार्गावरही एसी लोकल धावणार

बल्लारपूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा थेट मतदारांतून नगराध्यक्ष निवड प्रक्रिया १ सप्टेंबर १९७८ रोजी पार पाडली होती. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून एम. बाल बैरय्या यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या वेळी थेट मतदारांतून नगराध्यक्षपदाची निवडणूक १७डिसेंबर २००१ मध्ये झाली. यावेळी नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार म्हणून कनकमकुमार येलव्या यांची येथील मतदारांनी केली होती. तिसऱ्यांदा येथे नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट मतदारांतून २८ डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हरीश शर्मा निवडून आले होते.

Web Title: Chandrapur news wedding ceremonies impact on voting democracy tradition know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • voting news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.