Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात एसटी स्मार्ट कार्डचा गोंधळ; नोंदणी केली, पण कार्ड ॲक्टिव्ह नाही; प्रवाशांना पूर्ण भाड्याचा फटका

चंद्रपूर जिल्ह्यात एनसीएमसी कार्डसाठी २ लाख ७ हजार ८०७ प्रवाशांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी ३८ हजार ३५२ कार्ड अद्याप सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर सवलतधारकांना याचा फटका बसत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2026 | 12:55 PM
Chandrapur News: चंद्रपुरात एसटी स्मार्ट कार्डचा गोंधळ; नोंदणी केली, पण कार्ड ॲक्टिव्ह नाही; प्रवाशांना पूर्ण भाड्याचा फटका

Chandrapur News: चंद्रपुरात एसटी स्मार्ट कार्डचा गोंधळ; नोंदणी केली, पण कार्ड ॲक्टिव्ह नाही; प्रवाशांना पूर्ण भाड्याचा फटका

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात एनसीएमसी कार्डसाठी २ लाख ७ हजार ८०७ प्रवाशांनी केली नोंदणी
  • नोंदणी करूनही अनेक प्रवासी अपेक्षित सवलतीपासून वंचित
  • नोंदणी आणि प्रत्यक्ष सक्रियता यामध्ये मोठी तफावत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
चंद्रपूर: एसटी महामंडळाच्या प्रवासाला डिजीटल स्वरूप देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेला चंद्रपूर जिल्ह्यातच प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात २ लाख ७ हजार ८०७ प्रवाशांनी कार्डसाठी नोंदणी केली असली, तरी त्यापैकी ३८ हजार ३५२ कार्ड अद्याप सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना अपेक्षित सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे.

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

१ ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्डच्या वापराबाबत सक्ती करण्यात आल्याने निष्क्रय कार्डधारकांची अडचण अधिक वाढली आहे. कार्ड मशीनमध्ये स्वीकारले जात नसल्यास वाहकांकडून पूर्ण भाडे आकारले जात असल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर सवलतधारकांना याचा मोठा फटका बसत आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

चंद्रपूर जिल्ह्यात एनसीएमसी कार्डसाठी २ लाख ७ हजार ८०७ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १ लाख ६२ हजार ७६५ महिला, २२ हजार ९८७ ज्येष्ठ नागरिक, २० हजार ८५२ अमृत योजनेचे लाभार्थी आणि २ हजार २०४ इतर सवलतधारक आहेत. यापैकी १ लाख ६९ हजार ४५५ कार्ड सक्रिय झाले आहेत. सक्रिय कार्डधारकांमध्ये १ लाख ३० हजार ४७० महिला, १९ हजार ९३८ ज्येष्ठ नागरिक, १७ हजार ३४८ अमृत योजनेचे लाभार्थी आणि १ हजार ६९९ इतर सवलतधारकांचा समावेश आहे.

नोंदणी आणि प्रत्यक्ष सक्रियता यामध्ये मोठी तफावत

नोंदणी आणि प्रत्यक्ष सक्रियता यामध्ये मोठी तफावत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कार्डसाठी प्रक्रिया पूर्ण करूनही सवलत मिळत नसल्याने प्रवाशांना पूर्ण भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे निर्षक्रय कार्डाचा प्रश्न तातडीने निकाली काढून सर्व पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

सवलतीपासून कोण वंचित?

२ लाख ७ हजार ८०७ नोंदणीकृत प्रवाशांपैकी १ लाख ६९ हजार ४५५ कार्ड सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ३८ हजार ३५२ प्रवाशाची कार्ड अद्याप सक्रिय होणे बाकी आहे. या प्रवाशांना कार्ड सक्रिय होईपर्यंत प्रवासादरम्यान सवलतीचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur st smart card issue over 38000 ncmc cards inactive passengers struggle to get fare concessions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
1

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Indian Vehicle Exports Surge: भारतीय गाड्यांची परदेशात धूम! एप्रिल-जुलैच्या निर्यातीत मोठी झेप, ‘या’ आकड्यांनी वेधलं लक्ष
2

Indian Vehicle Exports Surge: भारतीय गाड्यांची परदेशात धूम! एप्रिल-जुलैच्या निर्यातीत मोठी झेप, ‘या’ आकड्यांनी वेधलं लक्ष

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
3

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
4

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.